Header Ads

 • Breaking News

  'ग्रेट भेटी'तून नक्कीच आदर्श अधिकारी निर्माण होतील - विनोद चव्हाण


  अहमदनगर । DNA Live24 - शेतकऱ्यांची मुले अधिकारी झाली पाहिजे, भ्रष्ट व्यवस्थेचा बिमाेड करायचा अाहे, स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत घडवायचा अाहे. त्यामुळे यशस्वी अधिकाऱ्यांच्या यशाेगाथा जिद्दी मुलांना एकवून संवाद घडवून अाणण्याचे काम केले जात अाहे. यातून नक्कीच अादर्श अधिकारी निर्माण हाेतील. असे प्रतिपादन सहायक पोलिस निरीक्षक विनाेद चव्हाण यांनी केले. ते नगर वाचनायात अायोजित ग्रेट भेट एक मुक्त संवाद कार्यक्रमात बाेलत हाेते.

   (आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.)

  ग्रामीण व शहरी भागातून स्पर्धा परिक्षांसाठी अालेल्या विद्या‌र्थ्यांचे दिपस्तंभ हाेण्यासाठी चेतना फाऊंडेशनने 'ग्रेट भेट : एक मुक्त संवाद' हा उपक्रम सुरू केला अाहे. केवळ निर्मळ हेतू ठेऊन या उपक्रमाची सुरूवात झाली अाहे. या उपक्रमाचे उद्धाटन श्री चव्हाण यांच्या व्याख्यानाने झाले. यावेळी ते म्हणाले, जिल्हा क्षेत्रफळाने माेठा अाहे. त्यामुळे येथे लाेकसंख्या देखील जास्त असून अल्पभुधारक शेतकरी जास्त अाहे. त्यामुळे बेकारीचे प्रमाण देखील वाढत अाहे. म्हणून मुलगा नाेकरीला लागेल, या अाशेने पालकांनी मुलांना शहराकडे पाठविले. मात्र हे विद्यार्थी शहरात येऊन काय करतात हे नव्याने सांगायला नकाे. 

  याेग्य मार्गदर्शन न घेतल्यामुळे अनेकदा अपयश येते. अशा वेळी विद्यार्थी व पालक दाेघे ‌खचून जातात. त्यामुळे तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही िकती वेळ अभ्यास करता. यापेक्षा, कसा अभ्यास करता. हे महत्वाचे अाहे. ते या उपक्रमातून लक्षात येणार अाहे. तसेच मुले अाजकाल २० ते २२ तास अभ्यास करतात. मात्र गुण तशा प्रकारचे मिळत नाही. म्हणून ज्याला िकंमत अाहे. असेच वाचले पाहिजे. शेतात काय पिकते या पेक्षा बाजारात काय िपकते याला महत्व द्या. 

  परिक्षेत काय विचारले जाते, पहिला त्याचा अभ्यास करा. मग पुस्तके हताळा, कधी काेणती पुस्तके हताळली पाहिजे, त्यातील नाेट्स कशा असाव्यात, अभ्यासाची वेळ कशी असावी, कुटुंब, मित्र, नातेवाईक व अभ्यास यांच्यातला समन्वय कसा साधायचा हे देखील अॅड. चव्हाण यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेसाठी अालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने या उपक्रमात सहभाग घ्यावा. अायएएस, अायपीएस, राज्यसेवा अशा अनेक क्षेत्रात यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांशी अापल्याला संवाद साधता येताे.

  (आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.)

  मनातील प्रश्नांचे उत्तेर मिळतात, यापेक्षा माेठे मार्गदर्शन काेणते नाही. त्यामुळे अादर्श अधिकारी घडविण्याचा वसा घेतलेल्या उपक्रमास व उपस्थित पाचशे िवद्यार्थ्यांना चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी चेतना फाऊंडेशनचे अध्यक्ष अमर कळमकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. पत्रकार सागर एस. शिंदे यांनी देखील मार्गदर्शन केले. तर ज्ञानेश्वर अाघाव, गणेश ठाेंबरे, सुनिल िपपळे, एकनाथ शारूख, किरण केदार, भारत गडदे, महेश पटारे, परमेश्वर काकडे, याेेगेश काकडे, शुभम गाेडसे, गणेश दारकुंडे, अदिनाथ खरात यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ‌थक परिश्रम घेतले.

   (आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.)

  Post Top Ad

  Post Bottom Ad