Header Ads

 • Breaking News

  भारतातील ख्रिश्चन व मुस्लिमांचे पूर्वज हिंदूच : डॉ.सुब्रह्मणम् स्वामी


  अहमदनगर । DNA Live24 - ख्रिश्‍चनांनी व मुस्लिमांनी आमचे पूर्वज हिंदू होते. हे कबूल करावे. त्यामुळे सर्व समस्या मिटतील. अकबर व औरंगजेबाच्या इतिहासावर इतिहासात अनेक पुस्तके, प्रकरणे लिहिलेली आढळतात, पण छत्रपती शिवरायांची लढाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, विजयनगरची लढाई, महाराणा प्रताप यावरची पुस्तके आढळत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा वास्तविकतेवर आधारित इतिहास लिहिण्याची गरज आहे. जिथे भारतीय लढले नाहीत, असा भारताचा कोणताही हिस्सा नाही, पण त्याचा इतिहासात उल्लेख आढळत नाही. एकूण हिंदू 80 टक्के आहेत.

  हिंदूंची ही संख्या कमी होवू देऊ नका. हिंदूंची ताकद अन्य समुदायांना माहिती आहे. त्यामुळे हिंदू एकत्र येवू नये, त्यांनी संघटित होवू नये, यासाठी अन्यशक्ती, समुदाय प्रयत्न करतात. हिंदूत्वामुळेच आपण सारे एकत्र जोडले जाणार आहोत. कन्याकुमारी पासून काश्मिरपर्यंत सारेजण हिंदूस्थानी आहेत. या सार्‍यांचे गुणसूत्र (डिएनए) एक आहे. आमच्या संस्कृतीचे नावच हिंदूस्थान आहे. त्यामुळे आत्मसन्मानाला ओळखा आपला खरा इतिहास जाणून घ्या, असे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ, खासदार डॉ. सुब्रह्मणम स्वामी केले.

  पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था व पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समितीच्यावतीने पंडित दीनदाळ स्मृती व्याख्यानमालेत डॉ. सुब्रह्मणम् स्वामी यांनी ‘राष्ट्रीय आस्मिता व एकात्मता मानवतावाद’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शांतीकुमार फिरोदिया मेमोरिअल ट्रस्टचे प्रमुख विश्‍वस्त व उद्योजक नरेंद्र फिरोदिया हे उपस्थित होते. 

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.रविंद्र साताळकर, पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन वसंत लोढा, उपाध्यक्ष गौतम दीक्षित, सचिव विकास पाथरकर, संचालक नरेंद्र श्रोत्री, दीप चंदे, व्याख्यानमाला समितीचे प्रमुख धनंजय तागडे, सुहास मुळे, कमलेश वैकर आदिंसह डॉ. सुब्रह्मणम् स्वामी यांचे व्याख्यान ऐकण्यास माऊली सभागृहात श्रोत्यांनी तुफान गर्दी केली होती.

  हिंदूचे रक्षण करणार्‍यालाच मत द्या, आयोध्येमध्ये कोणत्याही परिस्थितीत श्रीराम मंदिर होणार यात कोणताही संदेह नाही. भारतीय राज्य घटनेतील सर्व तरतूदी हिंदू संस्कृतीशी संबंधित असल्याने राज्य घटनेचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. या तरतूदींची अंमलबजावणी केल्यास भारत नक्कीच हिंदू राष्ट्र होईल, यात शंका नाही, असा विश्‍वास डॉ.सुब्रह्मणम स्वामी यांनी व्यक्त केला.

  डॉ. स्वामी म्हणाले की, गो हत्या बंदी, नशाबंदी, तसेच पूजेचा अधिकार घटनेत मुलभूत मानला आहे. मात्र कोणत्याही पूजेने समाजाचे स्वास्थ्य बिघडणार असेल तर त्यावर अंकुश, नियंत्रण सरकार ठेवू शकते. सेक्युलर शब्द राज्य घटनेत नाही. तो शब्द आणीबाणीच्या काळात नंतर घातला गेला. देशातील 40 हजार मंदिरे तोडण्यात आली. पण आयोध्येत श्रीराम मंदिर, काशीचे विश्‍वनाथ मंदिर व मथुरेत श्रीकृष्ण मंदिर अशी तीन मंदिरे करण्याचा निर्धार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत केला गेला. ही तीनही मंदिरे होणारच आहेत. 

  उत्तर प्रदेशात भाजपचे 85 आमदार निवडून आले. कारण तेथील मुस्लिम महिलांनी भाजपला मतदान केले. यामागे या पक्षाला मते दिली तर तिहेरी तलाक बंद होईल हा विश्‍वास मुस्लिम महिलांना होता, म्हणून त्यांनी मते दिली. प्रमुख पाहुणे नरेंद्र फिरोदिया म्हणाले, देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असलेल्या निर्णयांमुळे मोठे बदल होत आहे. यावेळी व्याख्यानमाला समितीचे बाळासाहेब भुजबळ, गौतम कराळे, अशोक बकोरे, मुकुल गंधे, अमर कळमकर आदिंनी परिश्रम घेतले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad