728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

सारसनगरला मनपा दवाखान्याचे उपकेंद्र सुरु करा : भाजपाची मागणी


अहमदनगर । DNA Live24 - सारसनगर सारख्या 30 ते 35 हजार लोकसंख्या असलेल्या भागात मनपाने अद्याप आरोग्य सुविधेचे उपकेंद्र सुरु केले नाही. सारसनगर परिसर विस्तारीत होत असून, नवीन वसाहती, अपार्टमेंट तयार होत आहेत. तसेच या परिसारात मोठ्या प्रमाणात मोल मजुरी व रोजंदारी काम करणारे नागरिक राहतात. त्यामुळे या गोर गरीब नागरिकांना आजच्या महागाईच्या काळात खाजगी दवाखान्यांच्या वैद्यकीय सुविधा परवडत नसल्याने सारसनगर भागात मनपाने दवाखान्याचे उपकेंद्र त्वरित सुरु करणे आवश्यक आहे, अशा मागणीचे निवेदन मनपाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम व शहर भारतीय जनता पार्टीचे वकिल आघाडीचे अध्यक्ष अॅड. राहुल रासकर यांनी मनपा आयुक्त घनश्याम मंगळे यांना दिले.

यावेळी बोलतांना उपमहापौर छिंदम म्हणाले, महापालिकेने सारसनगर भागात दवाखानाचे उपकेंद्र सुरु करण्याची नितांत आवश्यकता आहे. मनपाने फक्त उपकेंद्रास मान्यता व जागा उपलब्ध करुन द्यावी, खासदार दिलीप गांधी व राज्य शासनाच्या योजनांमधून निधी मंजुर करुन  उपलब्ध झालेल्या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्यात येईल. मनपा प्रशासनाने त्वरित या मागणीची अंमलबजावणी करुन आरोग्य केंद्रास मान्यता द्यावी. शहरात महानगरपालिकेचे नगरमधील माळीवाडा, केडगांव, तोफखाना, सावेडी, मुकुंदनगर या भागात  मनपाचे दवाखान्याचे उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रातून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत आहेत.

अॅड.राहुल रासकर म्हणाले, सारसनगर भागात 30 ते 35 हजार नागरिक वास्तव्यास आहेत. यामध्ये गोरगरीब नागरिकांची लोकसंख्या लक्षणिय आहे. त्यामुळे यांच्यासाठी महापालिकेचा दवाखाना एक आधार ठरु शकतो. सारसनगर परिसारात या आधी डेग्युचे रुग्ण आढळले आहेत. तसेच अनेक व्यक्तींना गोचिड ताप, टायफाईड, मलेरिया, हिवताप सारखे आजारही झाले आहेत. त्यामुळे या परिसारात महापालिकेचा दवाखाना असणे अत्यंत गरजेचे आहे.

यावेळी अज्जू शेख, मिलिंद भालसिंग, शरिफ सय्यद, सुरज पुंड, पांडूरंग डोंगरे, श्रीनाथ मैंद, अक्षय शिंगी, संदिप ढाकणे, नितीन जोशी, सिद्धांत शिंदे, अक्षय भालेराव, अभिषेक शिंदे, प्रसाद बोरा आदिंसह युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: सारसनगरला मनपा दवाखान्याचे उपकेंद्र सुरु करा : भाजपाची मागणी Rating: 5 Reviewed By: DNA Live24