Header Ads

 • Breaking News

  कोतकर पिता-पुत्रांचा अखेर शिवसेनेत प्रवेश !


  अहमदनगर । DNA Live24 - केडगावमधील महादेव कोतकर, हर्षवर्धन कोतकर यांनी असंख्य समर्थकांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संपर्क नेते रामदास कदम, सचिव अनिल देसाई, संपर्कप्रमुख भाऊ कोरेगांवकर, उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संजय लोंढे, संजय कोतकर आदी उपस्थित होते.

  यावेळी श्री. उद्धव ठाकरे की, शिवसेनेत घराणेशाही चालत नाही. शिवसेनेत नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जातो. नगर शहरात शिवसेना नेहमीच अग्रेसर राहिली असून, नगरकरांनी कायमच शिवसेनेला साथ दिली आहे. उपनेते अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकजण शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. शिवसेनेत प्रवेश करणार्या केडगावमधील सर्वांचे मी स्वागत करतो, असे ते म्हणाले.

  यावेळी विजय पठारे, रमेश परतानी, भाकरेमहाराज, डॉ. श्रीकांत चेमटे, अविनाश मेहेर, उपशहरप्रमुख वसंत शिंदे, अमोल येवले, नंदू ठुबे, प्रमोद ठुबे, आबा सातपुते, अभिजीत कोतकर, प्रशांत भाले, अजय आजबे, किरण ठुबे, मच्छिंद्र पठारे, वसंत ठुबे, भारत कांडेकर, अंगद महारनवर, परेश वाघ, बापू मतकर, पिंटू मोढवे, युवराज कोतकर, संग्राम कोतकर, अशोक ठोकळ, सुशांत कोतकर, बालू गुंजाळ, संदेश शिंदे, सुनील कवडे, सनी टेकाडे, कैलास जंगम, गोरख कारले, राम साठे, संतोष फसले, मंदार पवळ, दत्ता कोतकर उपस्थित होते.

  अनिल राठोड म्हणाले की, महादेव कोतकर, हर्षवर्धन कोतकर यांची घराणेशाहीमुळे राजकारणातून पीछेहाट झाली होती. त्यांनी अनेकांना घडविले आहे. केडगावमधील नागरिकांनी शिवसेनेची साथ केली आहे. आम्ही कधीही केडगावकरांशी दुजाभाव केला नाही. शिवसेनेच्या माध्यमातून येथे विकासाची कामे करण्यात आली आहेत. कोतकर पिता-पुत्रांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आमची ताकद वाढली आहे. केडगावमध्ये काँग्रेसला खिंडार पडले आहे, असे ते म्हणाले.

  महादेव कोतकर म्हणाले की, शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही असंख्य समर्थकांसह प्रवेश केला आहे. शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते व संजय कोतकर यांनी केडगावमध्ये शिवसेनेची ताकद वाढविली आहे. यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीत केडगावमध्ये शिवसेना जास्तीत जास्त जागा लढविण्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न करू, तसेच जास्तीत जास्त जागा निवडून आणू, असे ते म्हणाले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad