Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

जिल्हा परिषदच्या वेशीला टांगले मयत बालकांचे दप्तर !


अहमदनगर । DNA Live24 - निम्बोडी येथील घटनेत तीन निष्पाप बालकांना आपला जीव गमवावा लागला असताना, पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ मयत बालकांचे प्रतिकात्मक शाळेय पाटी, दप्तर व शिक्षण अधिकार कायद्याची प्रत जिल्हा परिषदेच्या वेशीला टांगून, टक्केवारी तळतळाट महाआक्रोश आंदोलन करण्यात आले.

तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य दरवाजाचे तळतळाट महादरवाजा नामकरण करुन जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनात अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, शोभा कुंटला, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल, अनिता कासार, हिराबाई आंतुनकर आदि सहभागी झाले होते.

नुकत्याच झालेल्या निंबोडीच्या घटनेने सर्वांची मने हेलावली. निंबोडी येथे पावसात शालेयभिंत कोसळल्याने श्रेयस रहाणे, सुमित भिंगारदिवे व वैशाली पोटे या तीन विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले. तर अनेक विद्यार्थी शिक्षकांसह जखमी झाले. इंग्रजांनी स्वांत्र्यपुर्व काळात बांधलेल्या दगडी शाळा अजूनही चांगल्या स्थितीत आहे. मात्र जिल्हा परिषदचे काही वर्षांच्या शाळा पावसाने कोसळत असून, याचा गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे. सध्या शासकीय कामात टक्केवारीची रीत बनल्याने निकृष्ट दर्जाचे काम नागरिकांच्या माथी मारले जात आहे.

झालेल्या शाळेय इमारतीच्या बांधकामात टक्केवारी खाल्ल्याने निकृष्ट दर्जाची शाळा बांधली गेल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. अनेक ठेकेदार देखील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याने हा भ्रष्टाचार चालत आहे. ज्या कुटुंबावर हे संकट कोसळले ते दूर होणार नाही. मात्र या सारख्या दुसर्‍या घटना घडू नये यासाठी भ्रष्ट नोकरशाहीवर लगाम लावणे गरजेचे असल्याचे अ‍ॅड.गवळी म्हणाले.

शासनाकडून शिक्षकांना गेलेलठ्ठ पगार दिले जातात. मात्र त्या प्रमाणात शिक्षणाचा दर्जा नसून, अनेक सोयी सुविधांपासून विद्यार्थी वंचित आहे. शिक्षण व्यवस्थेत बदल होणे आवश्यक आहे. गावात मंदिर उभारण्यासाठी लाखो रुपयांची वर्गणी होते. मात्र शाळेसाठी वर्गणी होत नसल्याची खंत अशोक सब्बन यांनी व्यक्त केली. प्रकाश थोरात व सुधीर भद्रे यांनी मनोगत व्यक्त करुन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन, भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्याची मागणी केली.

निंबोडीच्या घटनेत बळी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने किमान 10 लाख रुपयाची मदत द्यावी. जिल्ह्यात तडे गेलेल्या शाळांच्या इमारती दुरुस्त कराव्यात. नव्याने बांधण्यात आलेल्या शालेय इमारतींचा दर्जा तपासावा. निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे आढळलेल्या ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages