728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

निवडणुक कामावरून ग्रामसेवकांवर कारवाई नको : एकनाथ ढाकणे


अहमदनगर । DNA Live24 - निवडणुकीच्या कामात पंचायत समिती स्तरावरून देण्यात आलेल्या माहितीत चुका झालेल्या आहेत. या प्रकारात ग्रामसेवकांचा काही दोष नसून त्यांच्यावर कारवाई न करण्याचे निवेदन राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या शिष्टमंडळाने नगरचे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसेवकांना पंचायत समितीकडून माहिती मागितली जाते. मात्र बर्‍याचवेळा विहित नमुन्याबाबत संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे ग्रामसेवकांनी अचूक माहिती दिली तरी पंचायत समिती कार्यालयात व्यवस्थित पडताळणी न झाल्याने काही ठिकाणी समस्या निर्माण झालेली आहे. ग्रामसेवक सर्व प्रकारची निवडणुक कामे नियमितपणे करीत असतात. सध्या झालेल्या चुका तांत्रिक असून भविष्यात अशा चुका होवू नये यासाठी युनियननेही सर्व ग्रामसेवकांना सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायतींच्या कार्यकाळ मुदत समाप्तीबाबत प्रशासनाने ग्रामपंचायत स्तरावरुन माहिती मागवली आहे. ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या सभेपासून नवीन कार्यकारिणीची मुदत ग्राह्य धरली जाते. त्यानुसार ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकार्‍यांनी विहित नमुन्यात योग्य माहिती बिनचूक दिलेली आहे.

मात्र पंचायत समिती स्तरावरून जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या अहवालात तांत्रिक चुका झाल्या आहेत. त्याला जबाबदार धरून प्रशासनाने जिल्ह्यातील १०६ ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे. या कारवाईला ग्रामसेवक युनियनने हरकत घेतली आहे.

यावेळी युनियनचे संदीप बळीद, रमेश बांगर, बाळासाहेब कडू, सुनिल नागरे, युवराज ढेरे, टी.के.जाधव, वैष्णव उकांटे आदी उपस्थित होते. 
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: निवडणुक कामावरून ग्रामसेवकांवर कारवाई नको : एकनाथ ढाकणे Rating: 5 Reviewed By: DNA Live24