Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

'सोवळ मोडलं' म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा !


पुणे । DNA Live24 - केवळ ‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी पुण्यात घडला आहे. हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून ‘सोवळे मोडले’ म्हणून मेधा खोले यांनी पोलिसात तक्रार केली आहे.दरम्यान, याप्रकरणाची नेमकी तक्रार कशी नोंदवून घ्यायची याबाबत पोलिसांना देखील प्रश्न पडला होता. त्यांनी मेधा खोले यांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला. पण तरीही मेधा खोले या तक्रार नोंदवून घेण्यासाठी अडून बसल्या. 

अखेर पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मिडिया व सर्व स्तरातून श्रीमती खोले यांच्यावर टीका होत आहे. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने याबाबत प्रसिद्धीपत्रक काढले आहे. खोले यांनी हा गुन्हा मागे घेऊन हे प्रकरण सामोपचाराने मिटवावे, असे आवाहन महासंघाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages