Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

राहुल गांधींच्या दौऱ्यात नारायण राणेंना टाकले वाळीत !


मुंबई । DNA Live24 - निमंत्रण नसल्याने मराठवाड्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गेलो नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलं आहे. ते सिंधुदुर्गात बोलत होते. भाजपशी जवळील वाढल्याने कॉंग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींनी राणेंना साधे निमंत्रणही न देता वाळीत टाकल्याची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात होती.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. परंतु महाराष्ट्रातील पक्षाचे नेते नारायण राणे मात्र राहुल गांधींच्या कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत.

याविषयी विचारलं असता नारायण राणे म्हणाले की, “या कार्यक्रमाला नांदेड, मराठवाड्याचे कार्यकर्ते होते. आजचा कार्यक्रम आमच्या क्षेत्रात नव्हता. मुंबई-पुण्यात कार्यक्रम असता तर गेलो असतो. तिथल्या नेत्यांनी मला आमंत्रित केलं नव्हतं.”

शिवाय आजची बैठक पूर्वनियोजित होती. त्यामुळे आपण जाणं गरजेचं नसल्याचं राणेंनी सांगितलं.

गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणेंची भाजपशी जवळीक वाढली आहे. मात्र खुद्द पक्षाचे उपाध्यक्ष राज्यात असतानाही राणेंची गैरहजेरी चर्चेचा विषय बनला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages