728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

'पुरुषोत्तम' व 'शाहू मोडक'मध्ये घुमला 'माईक'चा आव्वाज !


पुणे । अहमदनगर । DNA Live24 - आव्वाज कोणाचा? अहमदनगरचा !!! 'माईक' आपला.. मग 'आव्वाज' पण आपलाच पाहिजे..! असा जल्लोष करीत यंदा न्यू आर्टस्,सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय, अहमदनगरच्या 'माईक' या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरले. दुग्धशर्करा योग म्हणजे नगरमध्ये आयोजित नटश्रेष्ठ शाहू मोडक करंडकावरही याच एकांकिकेने नाव कोरले आहे. पुण्यातील पुरुषोत्तम करंडक तब्बल ३५ वर्षांनंतर पुन्हा एकदा अहमदनगरने पटकावला आहे.

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल रविवारी जाहीर झाला. प्राथमिक फेरीतून ५१ महाविद्यालयीन संघांपैकी अंतिम फेरीसाठी ९ संघांची निवड झाली होती. ९ आणि १० सप्टेंबर या दोन दिवशी या ९ महाविद्यालयांनी उत्तम प्रकारे एकांकिकांचे सादरीकरण केले. यातून ४ महाविद्यालयांची पुरुषोत्तमसहित इतर ३ करंडकासाठी निवड करण्यात आली. 

 (आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.)

प्रथम क्रमांकाचा पुरुषोत्तम करंडक न्यू आर्टस् , सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाने पटकावला. द्वितीय क्रमांकाचा हरिविनायक करंडक पी. इ. एस. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 'ए एस एल प्लिज' या एकांकिकेने तर तिसऱ्या क्रमाकांचा संजीव करंडक बी.एम.सी.सी महाविद्यालयाच्या 'सॉरी परांजपे' या एकांकिकेने पटकावला. यावर्षी चौथ्या क्रमाकांचा जयराम हर्डीकर करंडकाचा मान कोणीच मिळवू शकले नाही. सर्वोत्कृष्ट आयोजित संघ म्हणून वि.आय.आय.टी महाविद्यालयाच्या 'कोंडी' एकांकिका ठरली.

नगरच्या शाहू मोडक स्पर्धेतही माईकचाच डंका वाजला. दुसरे पारितोषिक संगमनेर महाविद्यालयाच्या 'अतिक्रमण व डील'ने पटकावले. तर तिसरे बक्षीस पेमराज सारडा कॉलेजच्या 'ट्रॅफिक'ला मिळाले.

पुरुषोत्तम स्पर्धेतील बक्षीसे - दिग्दर्शन उत्तेजनार्थ (कृष्णा वाळके), अभिनय उत्तेजनार्थ (विराज अवचिते, कृष्णा वाळके, ).

शाहू मोडक स्पर्धेतील बक्षीसे - अभिनय दुसरे सदाशिव अमरापूरकर पारितोषिक (संकेत जगदाळे), सर्वाेत्कृष्ट लक्षवेधी अभिनय मिलिंद शिंदे पारितोषिक (विराज अवचिते). 

  आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: 'पुरुषोत्तम' व 'शाहू मोडक'मध्ये घुमला 'माईक'चा आव्वाज ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24