Header Ads

 • Breaking News

  राज ठाकरेंची फेसबुकवर 'दमदार' 'एन्ट्री'!  मुंबई । DNA Live24 - सोशल मीडियापासून कायम दूर असणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अखेर सोशल मीडियाशी संधान साधलं आहे.  मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात एका भव्य सोहळ्यात राज ठाकरे यांचं फेसबुक पेज लाँच करण्यात आलं. अधिकृत पेज कारतांना त्याला फेसबुकने व्हेरीफाईड केले आहे. नावासमोर निळ्या रंगाची खून असल्याने  अधिकृत पेज ओळखण्यास मदत होणार आहे.

  या फेसबुक पेजचा  उपयोग व्यंगचित्र, कामं, मतं, धोरणं आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी केला जाईल, असं राज ठाकरे यांनी कार्यक्रमात सांगितलं. पेज सुरु होताच तीन तासांत जवळपास साडे चार लाख फॉलोवर्स राज ठाकरे यांचे झाल्याने त्यांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नसल्याचे दिसून येते.

  राज म्हणाले, “खरं तर मी वर्तमानपत्र, साप्ताहिकं, मासिकात रमणारा माणूस आहे. नव्या माध्यमांकडे माझं लक्ष होतं, पण त्याच्याकडे मी जात नव्हतो. माझ्या मनात वर्तमानपत्र, साप्ताहिक काढायचं मनात होतं. पण ते चालवणं मोठं काम आहे. त्यामुळे सोशल मीडियावर, फेसबुकवर यावं असं वाटलं, त्यामुळे आज फेसबुक पेज लाँच करतोय” राज ठाकरेंनी इतक्या उशिरा फेसबुकवर का, या प्रश्नाचंही उत्तर दिलं.

  ते म्हणाले, “दाऊदला भारतात आणणारं असं मोदी सरकार सातत्याने थापा मारत आहे. पण दाऊदला स्वत:लाच भारतात यायचं आहे. दाऊद इब्राहिमला भारतात येऊन मातृभूमीत मरण्याची इच्छा आहे. त्याची केंद्र सरकारशी सेटलमेंट सुरु आहे. मात्र त्याला भारतात आणून आम्ही ओढून आणल्याचा दावे करुन, हे सरकार निवडूक लढवेल” असा गौप्यस्फोटही राज ठाकरे यांनी केला.

  खोटं बोलून मोदी सरकार सत्तेत आलं. ज्या सोशल मीडियाचा वापर करुन हे सत्तेत आले, त्यांना आता हाच सोशल मीडिया गैर वाटू लागला आहे, असं राज ठाकरे म्हणाले.  मोदींच्या ट्विटर अकाऊंटमधील 48 टक्के तर राहुल गांधींच्या अकाऊटंमधील 54 टक्के फॉलोअर्स फेक आहे, असं राज ठाकरेंनी नमूद केलं.

  मुंबई गुजरातला जोडण्याच्या जुन्या स्वप्नासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे. मुंबई-अहमदाबाद या मार्गावरच बुलेट ट्रेन का? मुंबईला जोडण्यासाठी देशातील अन्य शहरांचा पर्याय नव्हता का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.मुंबई आमची होती, आहे आणि राहणारच, मराठी माणसाला नख लावायचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्रभर धिंगाणा घालेन, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

  देशभर शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांच्या करता काही करायचं सोडून लाख लाख कोटीच्या बुलेट ट्रेन्स का आणि कोणासाठी सुरु करताय?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. भाजपमध्ये काम करणारे मराठी नेते हुजरे झाले आहेत, त्यांना कशाचंही देणंघेणं नाही. ते स्वाभिमान गमावून बसले आहेत.भाजपचा सध्याचा डोलारा हा उलटा पिरॅमिड आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

  हे आहे राज ठाकरे याचं फेसबुक पेज


  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad