728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कॉंग्रेसचे माजी आमदार राजहंस सिंह यांचा भाजपात प्रवेश


मुंबई । DNA Live24 - मुंबईमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत राजहंस सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कृष्णा हेगडेनंतर भाजपमध्ये प्रवेश करणारे राजहंस सिंह हे मुंबईतले दुसरे काँग्रेस आमदार आहेत.

मंत्रालयामध्ये राजहंस सिंह यांचा पक्षप्रवेश पार पडला. काँग्रेसला लागलेली गळती सुरुच असून भाजपमध्ये नेत्यांचं इनकमिंग सुरु आहे. एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपच्या मार्गावर असल्याच्या चर्चा असताना राजहंस सिंह यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कॉंग्रेसचे माजी आमदार राजहंस सिंह यांचा भाजपात प्रवेश Rating: 5 Reviewed By: DNA Live24