728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

एसपींनी केला गुणवंत पोलिस पाल्यांचा गौरव


अहमदनगर । DNA Live24 - तुमचे पालक ज्याप्रमाणे अहोरात्र सेवेसाठी कटीबद्ध असतात. तसेच तुम्हीही अभ्यासात व आवडत्या गोष्टींमध्ये गर्क रहा. आजवर जसे यश मिळवले आहे, तसेच यापुढेही मिळवत रहा. तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यात आपले स्थान निर्माण करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करा. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे मार्गदर्शन किंवा मदत लागली, तरी आम्ही केव्हाही तयार आहोत, असे अाश्वासन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलिसांच्या पाल्यांना दिले.

विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या पोलिसांच्या पाल्यांचा नुकताच पोलिस अधीक्षक कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी पोलिस अधीक्षक शर्मा बोलत होते. या सत्कार सोहळ्याला अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे, गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक अरुण जगताप, पोलिस कल्याण विभागाचे पोलिस निरीक्षक नारायण वाखारे आदी उपस्थित होते.

यावेळी पोलिस अधीक्षक म्हणाले, पोलिस कर्मचारी दिवसरात्र त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी झटत असतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. मात्र, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल अभिमान बाळगून त्यांच्या पाल्यांनी मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. असेच यश यापुढेही मिळवत रहावे. अतिरिक्त अधीक्षक पाटील, सहायक अधीक्षक शिंदे, उपअधीक्षक भोईटे यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. तसेच पोलिसांच्या मुलांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

या मुलांचे कौतुक - शलाका पी. आळकुटे, सिद्धेश सुनिल चव्हाण, रोहिणी एस. वीर, वैष्णवी ए. जाधव, वैभव आर. काळे, करण एस. बांगर, वैभव एन. गर्जे, वैष्णवी प्रदीप गायके, आकांक्षा के. पवार, श्रद्धा बी. दौंड या गुणवंत पोलिस पाल्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मिठाई देवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. पोलिस अधीक्षकांनी केलेल्या या कौतुकाबद्दल पोलिस कर्मचाऱ्यांनीही कृतज्ञतेची भावना व्यक्त केल्या. त्यांच्या चेहऱ्यावरही अभिमान व आनंद दिसत होता.

आमचे Facebook पेज लाईक करा व Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: एसपींनी केला गुणवंत पोलिस पाल्यांचा गौरव Rating: 5 Reviewed By: DNA Live24