Header Ads

 • Breaking News

  अंजली-नंदिनी बहिणी म्हणजे नगरचे सांस्कृतीक वैभव !


  अहमदनगर । DNA Live24 - समाजातील विविध उपक्रमांना नेहमीच साथ देणाऱ्या, पण त्याच बरोबर शहरातील सामाजिक, संस्कृती व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे रामावतार मोहनलाल मानधना ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत जिल्हाध्यक्ष विठ्ठलदास आसावा यांनी व्यक्त केले. ाआपल्या गायनाने देशभरात नगरचे नाव उज्वल करणाऱ्या अंजली व नंदिनी गायकवाड या भगिनी नगर शहराचे सांस्कृतीक वैभव असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

  मानधना फार्म येथे अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभा आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत सारेगमपा विजेती लिटील चँम्प अंजली गायकवाड हिचा जिल्हा  माहेश्वरी सभा व रामावतार मोहनलाल मानधना ट्रस्टतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी माहेश्वरी समाजाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आसावा यानी रोख स्वरूपात व मानधना ट्रस्टतर्फे अंजलीला शैक्षणिक  मदतीचा  धनादेश सानिया पराग मानधना हिच्या हस्ते देण्यात आला. तसेच तिची बहीण नंदिनी व मातापित्यांचा सत्कार करण्यात आला.

  यावेळी माहेश्वरी सभेचे सचिव अजय जाजू, सहसचिव रामचंद्र राठी, मोहनलाल मानधना, पराग मानधना, डॉ.ज्योति दीपक, डॉ. किरण व डॉ. वैशाली तसेच जिल्हातून आलेले तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, नगरमधील मान्यवर उपस्थित होते. मानधना परिवारातर्फे उपस्थित पदाधिकारी व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अंजली व नंदिनी यांनी गाणी सादर करून उपस्थितांची मने जिकून घेतली. पराग मानधना यांनी सर्वांचे आभार मानले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad