728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

एनसीसी सोल्जर फ्रंटच्या सोशल मिशनची मुहूर्तमेढ

सोशल मिशनसाठी एकत्र आलेली एनसीसी सोशल फ्रंट. छायाचित्र साैजन्य : नगरी सातारकर
शेवगाव । DNA Live24 - (नगरी सातारकर)- आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक चुकीच्या गोष्टी आपणास खटकतात. त्यासाठी  सरकार, शासनासह समाजातील इतर घटकांना आपण दोष देत बसतो. परंतु, यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा हे चुकीचे दुरुस्त करण्यासाठी आपण काय करतोय हे महत्वाचे. अशाप्रकारे आत्मपरीक्षण करून आपल्या सुनिश्चित सोशल मिशनच्या पूर्तीसाठीची मुहूतमेढ शेवगाव येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयातील एनसीसीच्या माजी छात्रसैनिकांच्या एनसीसी सोल्जर फ्रंट ने नुकतीच रोवलीय.

२२ जानेवारीला होणाऱ्या स्नेहमेळाव्यानंतर आपल्या सोशल मिशनच्या दिशेने हे छात्र दमदार पाऊल टाकणार आहेत. यानिमित्त माजी छात्रांची एकत्र येण्याची संकल्पना आणि त्याला येणाऱ्या मूर्त स्वरूपाचा घेतलेला हा अनोखा लेखाजोखा. 

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील एनसीसीचे  माजी छात्रसैनिक व नाशिक येथील सकाळचे वरिष्ठ पत्रकार ऍड. उमेश अनपट आणि औरंगाबाद उच्चं न्यायालयातील ऍड. संदीप आंधळे यांनी सर्व माजी एनसीसी छात्राना प्रथम एकत्र आणण्याचे ठरवले. त्यानुसार प्रथम व्हाट्सअपर एनसीसी सोशल फॉरम हा ग्रुप बनवण्यात आला. त्यामध्ये सुरुवातीला काही जणांना ऍड करून या मागील सोशल मिशन चा उद्देश विशद करण्यात आला. 

आपण एनसीसीमधील मित्र एकत्र येऊ या विचारानेच सर्व आनंदून गेले. आनंद वर्षांपासून दूर असणारे मित्र प्रथमच एकमेकांशी संवाद साधू लागले. ग्रुप मधील दाखल मित्रांच्या गुरुपामुळे सर्वाना एकत्र आणण्याच्या संकल्पनेस आणखी बळ मिळाले. यानंतर सहा महिन्याच्या कालावधीनंतर दिवाळीनंतर पाडव्याला उमेश अनपट आणि ठाणे पॉलिसमध्ये कार्यरत गणेश देशमूख यांनी शेवगाव येथील एनसीसी युनिटचे सर्वेसर्वा ऑनररी मेजर जी.एम. चोथे यांच्याशी या संकल्पनेविषयी चर्चा केली. त्यांना ती खूपच भावली. 

या नंतर काही दिवसांनी श्री. चोथे सर यांच्या घरी मारुती फरताळे, अरुण चोथे, किरण कानडे, वसंत देशमुख यांची पुढील मार्गक्रमणासाठी बैठक झाली. यानंतर आठवडाभरात श्री. चोथे सर व श्री. अनपट यांनी न्यू आर्ट्सचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर यांना या विषयी सांगितले. याचे कौतुक करत त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली. गुरुजनांनी दिलेल्या पाठिंब्यानंतर या संकल्पनेस मूर्त स्वरूप येण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला. या बैठकीची माहिती ग्रुपवर टाकल्यानंतर सर्वांना उधाण आले. 

तोपर्यंत अवघे २० ते २५ जण या ग्रुप मध्ये ऍड झालेले होते. या नंतर अवघ्या चार दिवसांमध्ये ग्रुपची संख्या सत्तरवर पोहचली. ज्याला मिळेल त्या माजी मित्राचा नंबर प्रत्येकजण ऍड करतोय. आता हा करावा शंभरीवर पोहचलाय. एवढ्या मोठ्या स्वरूपात ग्रुपची ताकद एकत्र आल्यानंतर २३ डिसेंबर रोजी चोथे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मतकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली व एएनओ बापूसाहेब फुंदे सर यांच्या उपस्थितीत न्यू आर्ट्स महाविद्यालयात २२ जानेवारीला होणाऱ्या स्नेहमेळाव्याच्या नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. 

बैठकीस राष्ट्रवादी युवक जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय कोळगे, सकाळचे पत्रकार ऍड. उमेश अनपट, ऍड. संदीप आंधळे, प्राचार्य संदीप घुगे, सोने व्यावसायिक अतुल दहिवाळकर, बांधकाम व्यावसायिक संदीप गोबरे, पंचायत समिती क्लार्क मारुती फरताळे, सीआरपीएफचे सैनिक प्रकाश भुसे, सोलर व्यावसायिक किरण कानडे, ऍड. उद्धव चेमते, प्रा. भारत धनावडे, व्यावसायिक रमेश चव्हाण, प्राचार्य अरुण चोथे, प्रा. वसंत देशमुख, पोलीस हवालदार नवनाथ बर्डे, ऍड. रवींद्र पवार हे माजी छात्रसैनिक उपस्थित होते. 

बैठकीतल्या चर्चेला अनेक रंग होते. महाविद्यालयातील हळवे करणाऱ्या अनुभवांवर बोलताना भावनिकतेतून सुरुवात झाली. सोशल मिशनच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी एकजूट होण्याच्या खंबीरपणे घेतलेल्या निर्णयानंतर चर्चेने पूर्णविराम घेतला. अनेक विषयांचा उहापोह करण्यात आला. २२ जानेवारीला स्नेहमेळावा घेण्याचे ठरले. प्रामुख्याने ज्या एनसीसीने आपल्याला घडवले, वाढवले, मोठे केले अश्या या येथील एनसीसीच्या युनिटमागे खंबीरपणे उभे राहण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. 

एनसीसी आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण तन, मन, धनाने एकत्र येऊन काम करण्याची ग्वाही प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित सर्व छात्रांनी दिली. यानंतर या सोशल मोहिमेच्या उद्दीष्ठपुर्तीसाठी एकत्र आलेल्या छात्रसैनिकांच्या संस्थेला समर्पक नाव देण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. त्यासाठी झालेल्या प्रदीर्घ मंथनानंतर एनसीसी सोल्जर फ्रंटचा जन्म झाला.

आता अद्भुत स्नेहभेट -येत्या २२ जानेवारीला न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचे प्रतीक असलेल्या येथील भव्यदिव्य नूतन इमारत, भव्य सभागृह आदीचे उदघाटन उपकुलगुरूंसह विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. याच सुवर्ण दिवसाचे औचित्य साधून एनसीसीच्या माजी छात्रसैनिकांच्या अद्भुत, अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या जबाबदारीच्या गर्तेत अडकलेले छात्रसैनिक पुन्हा एकदा आपल्या महाविद्यालयाच्या आपुलकी, स्नेहाच्या छत्राखाली काहीकाळ विसावणार आहेत. आता ओढ लागलीय ती या दिवसाची, भेटीची. 
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: एनसीसी सोल्जर फ्रंटच्या सोशल मिशनची मुहूर्तमेढ Rating: 5 Reviewed By: DNA Live24