Header Ads

 • Breaking News

  शिक्षक परिषद महाधरणे आंदोलनावर ठामच


  अहमदनगर । DNA Live24 - महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाची विविध शैक्षणिक मागण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मात्र शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण होण्यासाठी नागपुर येथील हिवाळी अधिवेशन काळात १३, १४ व १५ डिसेंबरला महाधरणे आंदोलनास संघटना ठाम आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी केले आहे.

  शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष अामदार नागो गाणार व राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषदेचे शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेवून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर चर्चा केली. आठ दिवसात सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्‍वासन शिक्षणमंत्री तावडे यांनी दिले. तसेच महाधरणे आंदोलनाच्या पार्‍वभुमीवर शिक्षक परिषदेची राज्य कार्यकारणी बैठक पुणे येथे झाली.

  १ व २ जुलैला घोषित शाळा व तुकड्यांना अनुदान मिळणे. जुनी पेंन्शन योजना लागू करणे. चुकीचे संच निर्धारण व समायोजन, अतिरिक्त शिक्षकांचे वेतन, १६२८ शाळांना पुढील टप्पा अनुदान मिळणे, यासोबतच अदिवासी विकास व समाज कल्याण आश्रम शाळांतील शिक्षकांच्या प्रश्‍न सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली. महा राज्यव्यापी धरणे आंदोलनात सहभागी होवून, हक्काच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आंदोलन यशस्वी करु, असे जिल्हाध्यक्ष बोडखे म्हणाले.

  हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सरकार्यवाह नरेंद्र वातकर, विभागीय कार्यवाह रमेश चांदुरकर, राज्य कार्यवाह सदस्य राजेंद्र गुजरे, विभागीय अध्यक्ष जे. के. शर्मा, विभागीय कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरकर, कार्यालय मंत्री गंगाधर टप्पे, नाशिक विभाग अध्यक्ष सुनिल पंडीत प्रयत्नशील आहेत.

  Post Top Ad

  Post Bottom Ad