728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

तगादा चुकवायला आला, अन् मरता मरता वाचला !

दीड तासाच्या प्रयत्नांनंतर युवक सुखरुप विहिरीबाहेर

नेवासे । DNA Live24 - तालुक्यातील घोडेगाव शिवारात नगर-औरंगाबाद हायवेजवळ चंद्रभान सोनवने यांच्या शेतातील विहिरीत एका युवकाने उडी मारली. हा प्रकार सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडला. या घटनेची माहिती मिळताच सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे, सहकारी आणि घोडेगाव ग्रामस्थांनी या युवकाला दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर यशस्वीरित्या बाहेर काढले. पैशांचा तगादा चुकवण्यासाठी त्याने घोडेगावात येऊन विहिरीत उडी मारली. पण, पोलिस व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला. (आम्हाला Facebook पेज व Twitter वर फॉलो करा)

विहिरीबाहेर काढलेला युवक - छाया - किशोर प्रधान
नेमकं काय झालं ? - दीपक ज्ञानेश्वर लबडे (वय 20, रा. श्रीरामपूर) असे युवकाचे नाव आहे. दीपक एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तो होंडा शाईन मोटारसायकलवर घोडेगाव चौफुल्यावर आला. त्याच्यासोबत राहुरी येथील दोन युवक होते. बराच वेळ ते या परिसरात फिरत होते.

तेथून दीपक एकटाच मोटारसायकलवर औरंगाबादच्या दिशेने गेला. तासभर होऊनही तो न परतल्याने इतर दोघांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. काही वेळाने त्यांना दीपकने एका विहिरीत उडी घेतल्याचे समजले. गावातील लोकांनाही ही वार्ता समजली. घोडेगाव सोसायटीचे संचालक बालु पाटील सोनवणे यांनी ही बाब चौकात बंंदोबस्ताला असलेले सोनईचे एपीआय किरण शिंदे यांना सांगितली. (आम्हाला Facebook पेज व Twitter वर फॉलो करा)

हे अाले धावून - एपीआय किरण शिंदे यांनी तत्काळ पोलिस कॉन्स्टेबल काका मोरे, बाबा वाघमोडे, गणेश धोत्रे, शिवाजी माने या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बालू पाटील सोनवणे, लखन भोसले, किशोर प्रधान, नवनाथ भोसले, सर्जेराव सोनवणे, राम सोनवणे, संकेत ठोंबळ, बाळासाहेब ठोंबळ, जालु सोनवणे, संतोष पुंड, प्रदिप भगत, आदिनाथ सोनवणे, संदिप बनसोडे, दिलीप शहाराव, हेही मदतीला धावून आले..

अंधार असल्याने विहिरीत काहीच दिसत नव्हते. जमलेल्या ग्रामस्थ व पोलिसांनी विहिरीत टॉर्चच्या साह्याने डोकावले असता दीपक पाण्यात तरंगत एका कडेला लटकल्याचे दिसले. सुरुवातीला मोठा दोरखंड सोडला. पण दीपक त्याच्या साह्याने वर येत नव्हता. त्यामुळे आणखी दोरखंड व एक विणलेली बाज आणण्यात आली. ही बाज दोरखंडाच्या साह्याने पुन्हा त्या विहिरीत सोडण्यात आली.

 आम्हाला Facebook पेज व Twitter वर फॉलो करा)

बाजेवर बसवून युवकाला बाहेर काढले.  छाया - किशोर प्रधान.
हे होतं कारण - विहिरीत सोडलेल्या बाजेवर दीपक बसल्यानंतर मोठ्या मुश्किलीने त्याला वर काढण्यात आले. पाण्यात पडून गारठल्यानं त्याला शेकोटी पेटवून ऊब देण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत दीपक सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होता. नंतर मात्र पैशांच्या व्यवहारातुन हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले. पैशांचा तगादा चुकवण्यासाठी तो इकडे पळून आला होता. त्यातूनच त्याने हे कृत्य केले.

पोलिसांनी दीपकच्या पालकांसोबत संपर्क साधून त्यांना घोडेगावात पाचारण केले. त्यावेळी हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगू नका, अशी गयावया तो करू लागला. रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्याचे वडील ज्ञानेश्वर लबडे घोडेगावात आले. त्यांचीही चौकशी करण्यात आली. याप्रकरणी सोनई पोलिस स्टेशन डायरिला नोंद घेऊन व  समज देऊन  दिपकला पालकांच्या ताब्यात सोपवण्यात आले. (आम्हाला Facebook पेज व Twitter वर फॉलो करा)

 API किरण शिंदे
घोडेगावकरांचे आभार - घोडेगावचे लोक चांगले आहेत. अडीअडचणीत कोणीही कोणाच्या मदतीला शक्यतो धावून येत नाही. त्यात पोलिसांचे काही प्रकरण असेल, तर चार हात लांबच बरे, अशी मानसिकता असते. मात्र घोडेगाव ग्रामस्थ सदैव मदतीला तत्पर असतात. त्यांच्या मदतीमुळे व प्रसंगावधानामुळेच आज या युवकाचे प्राण वाचवू शकलाे. - किरण शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक, सोनई पोलिस स्टेशन.

(आम्हाला Facebook पेज व Twitter वर फॉलो करा) 
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: तगादा चुकवायला आला, अन् मरता मरता वाचला ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24