Our Feeds

शुक्रवार, २५ मे, २०१८

DNA Live24

छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर ? नाशिकमध्ये सेनेच्या उमेदवाराला मदत


नाशिक : DNALive24-
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे. नाशिक विधान परिषदेत शिवसेनेच्या विजयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांचीही मदत लाभली, असा खळबळजनक दावा विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केल्याने भुजबळ लवकरच सेनेत प्रवेश करणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.

या निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जातं होतं. मात्र तरीही शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंनी 200 मतांनी विजय मिळवला.

तुरुंगातून सुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. शिवाय पंकज भुजबळही ‘मातोश्री’वर भेटीला गेले होते. महत्वाचं म्हणजे शिवसेनेशी जुने ऋणानुंबध आहे, असं विधान त्यावेळी भुजबळांनी केलं होतं.

याशिवाय नुकतंच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भुजबळांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती.

या सर्व बाबीवरुन भुजबळ आणि शिवसेनेची जवळीक झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केलेल्या दाव्यात तथ्य असू शकतं, असं राजकीय विश्लेषक म्हणतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत भुजबळ पुन्हा शिवसेनेत डेरेदाखल होतील अशी अटकळ बांधली जात आहे.

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »