निवडून आल्यावर शिवसेनेचे दराडे गेले पंकजांच्या भेटीला


मुंबई : DNALive24- भाजपने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विरोध करूनही विधानपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेना आ. नरेंद्र दराडे यांनी भाजपच्या नेत्या ना. पंकजा मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली. शिवसेनेच्या आ. दराडे यांनी निवडून आल्यावर ही भेट घेतल्याने नाशिकमध्ये भाजपच्या काही नेत्यांनी दराडे यांच्या पाठीमागे निवडणुकीत आपली ताकद उभी केली तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.

नाशिक विधान परिषदेत शिवसेनेच्या विजयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांचीही मदत लाभली, असा खळबळजनक दावा विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केला होता. भाजप उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीच्या एका गटाने दराडे यांना मदत केली. त्यामुळेच दराडे निवडून आले असा कयास व्यक्त होत होता. मात्र दराडे यांनी मुंडे यांची भेट घेतल्याने भाजपाचाही एक गट शिवसेनेच्या दराडे यांच्या समवेत तर नव्हता ना? असा प्रश्न आहे. भेट घेतल्यावर पंकजा यांनी दराडे यांना शुभेच्छा दिल्या.

या निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जातं होतं. मात्र तरीही शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंनी 200 मतांनी विजय मिळवला. दराडे यांच्या पंकजा भेटीमागे जातीय समीकरणे असण्याची शक्यता असून, त्याद्वारे तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या