सव्वा वर्षात रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासनाची उभारणी : भिडे गुरुजी


सातारा : DNALive24 - सुवर्ण सिंहासन पर्यटनस्थळ म्हणून उभे करणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना कळावा, यासाठी रायगडावर हे सिंहासन उभे करणार आहे. येत्या सव्वा वर्षात या 32 मण सुवर्ण सिहांसनाची स्थापना करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी केले.


साताऱ्यातील कला वाणिज्य महाविद्यालय मैदानावर आयोजित शिव प्रतिष्ठाण हिंदुस्थानच्यावतीने '32 मण सुवर्ण सिंहासन व खडा पहारा' या विषयावर जाहीर सभेत ते बोलत होते. संभाजी भिडे गुरूजी म्हणाले, 32 मण सोन्याचे सिंहासन नामशेष झाले. या  गोष्टीला 330 वर्ष झाले. रायगडावर 32 मण सुवर्ण सिंहासनाची पुर्नस्थापना प्रेरणा देणारे काम आहे. ते काम येत्या सव्वा वर्षात पूर्ण करणार आहोत. हे सिंहासन प्रेक्षणीय स्थळ म्हणून नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना समजावा यासाठी उभे करणार आहे. त्यासाठी 360 दिवस 38 जिल्ह्यातील धारकरी खडा पहारा करणार आहेत. देशावर जेवढी आक्रमण झाली तेवढी जगातील कोणत्याच देशावर झाली नाहीत. आक्रमणांचा भक्ष्य असलेला हा देश आहे.

187 राष्ट्र आहेत. त्यापैकी आपला एक राष्ट्र आहे. आपल्या इतके भौगोलिक राष्ट्र कोठेही सापडणार नाही. लक्षावधी एकर जमीन आपल्याजवळ आहे. त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. देशात अफाट जलसंपत्ती आहे. नद्या, वनसंपदा असे चित्र कोठेच नाही.

धर्माच्या बाबतीत आपण सिंह आहोत इतर मांजर आहेत. ज्यांना बुद्धी नाही त्या माणसाला कमी लेखी नये व अज्ञानी माणसाला हसू नये. देशात ज्या ज्या परकीय सत्ता वाढल्या फोफावले त्या सैन्याच्या बळावर ते सैन्य हिंदूंचे अशा एका नादान समाजात आपण जन्माला आलो. देव असलेला धर्म याची जाणीव नसलेला देश म्हणून भारताची ओळख आहे. स्वत:साठी जगणारा हिंदू आहे. शिवछत्रपती ज्या काळात जन्माला आले त्या काळात हिंदुस्थानची स्थिती कशी होती याचा विचार केला पाहिजे. लोकांमध्ये भाषेचा व देशाचा अभिमान नाही. हा समाज राष्ट्र म्हणून टिकायचा असेल तर त्याची जाणीव व्हायची असेल आत्मसन्मान जागृत केला पाहिजे. सत्य आणि संस्कृती टिकवण्यासाठी शस्त्र असले पाहिजे.