'ती' व्हायरल क्लीप पोलिसांची नाही ‌‌‌‌‌?


अहमदनगर । DNA Live24 - चोर-लुटारू आणि फासे-पारधी याच्या संबंधी पोलिसांच्या नावाने एक बनावट ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेली आहे. मात्र या क्लीपशी पोलिसांचा काहीही संबंध तर नसून, असा कोणताही प्रकार नसल्याने त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अहमदनगर पोलिसांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात एक क्लीप फिरत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केलेल्या आवाहनाच्या नावाने ही क्लीप प्रसारित केली गेलेली आहे. प्रत्यक्षात या क्लीपमध्ये मात्र तसा काहीही उल्लेख नाही. क्लीपमध्ये लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या तसेच गावात चोऱ्या करणाऱ्या टोळ्या आल्याचे सांगून तरुणांनी गावात गस्त घालण्याचे आणि दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच अशी कोणतीही क्लीप पोलिसांकडून प्रसारित केलेली नाही, अशी माहिती नगर पोलिसांनी दिली आहे. ही क्लीप कोणीही फॉरवर्ड करू नये, असे आवाहन करण्यात अाले आहे. तसेच ती कोणी तयार केली व प्रसारित केली, याचा शोध आता नगर पोलिस घेत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
.