जम्मू-कश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार


जम्मू काश्मीर : DNALive24-

जम्मू - काश्मीर मधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराने आज पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच ३ जवानांसह ११ लोक जखमी झाले आहेत. पंजाबमधील पठाणकोटच्या जवळ असलेल्या कठुआ पासून जम्मू जिल्ह्यातल्या अखनूर पर्यंत असलेल्या २०० किलोमीटर लांब आंतरराष्टीय सीमेवर ३६ हून अधिक भारतीय सैन्याच्या चौक्या व रहिवासी भागात जोरदार गोळीबार सुरु आहे. दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरु असल्याने सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

मंगळवारी जोरदार गोळीबाराने सांबा जिल्ह्यात दोन, जम्मू जिल्ह्यात दोन व कठुआ जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सीमेवर १४ मे पासून पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारात आतापर्यंत बीएसएफच्या दोन जवानांसह १२ लोकाचा मृत्यू झाला असून, ५४ जन जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराने नागरिक सुरक्षित ठिकाणी पलायन करत आहेत.

मोदी सरकार आल्यानंतर पाकिस्तानला त्याच्याच भाषेत जोरदार उत्तर दिले जाईल अशी अपेक्षा होती मात्र भारताला वारंवार त्रास देणाऱ्या पाकिस्तानवर जोरदार कारवाई झालेली नाही. त्यामुळे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याची मागणी देशभरातून होत आहे.