'लातूर-बीड-उस्मानाबाद'ची मतमोजणी हायकोर्टाने ढकलली पुढे!बीड : DNALive24-

आज होणारी लातूर - बीड - उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी हायकोर्टाच्या निर्णयामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.


लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या आ. रमेश कराड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. मात्र पंकजा मुंडे यांनी ऐनवेळी मास्टरस्ट्रोक मारत रमेश कदम यांना अर्ज माघारी घ्यायला लावला. यामुळे राष्ट्रवादीची पुरती नाचक्की झाली. त्यामुळे राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा जाहीर केला. या निवडणुकीची मतमोजणी आज (दि.२४) होणार होती.

या जागेची मतमोजणी उद्या नाही, मग नेमकी कधी होईल, याबाबत काहीही माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रात दिलेली नाही. त्यामुळे संभ्रम कायम राहिला आहे.