पंकजा- धनंजयच्या लढाईत विजय कोणाचा होणार?


बीड : DNALive24-
लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या आ. रमेश कराड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. मात्र पंकजा मुंडे यांनी ऐनवेळी मास्टरस्ट्रोक मारत रमेश कदम यांना अर्ज माघारी घ्यायला लावला. यामुळे राष्ट्रवादीची पुरती नाचक्की झाली. त्यामुळे राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा जाहीर केला. या निवडणुकीची मतमोजणी उद्या (दि.२४) होणार असून, पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या या लढाईत कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी  यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं.

कराड यांच्या माघारीमुळे राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
या मतदारसंघात भाजपने सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे. धस यांची राष्ट्रवादीने हकालपट्टी केली आहे. कराड यांना अर्ज माघारी घ्यायला लावून पंकजा यांनी धनंजय मुडे यांना मोठा धक्का दिला होता. उद्या कोण जिंकणार याबाबत उत्सुकता आहे.