Header Ads

 • Breaking News

  अभिनेत्री रविना टंडनच्या पुतळ्याचे दहण !  नगर : DNALive24-
  शेती माल व दूधाला योग्य हमीभावासाठी चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभुमीवर सिने अभिनेत्री रविना टंडन हीने शेतकरी आंदोलकां विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भूमीपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने दिल्लीगेट समोर रविना टंडन हीच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन त्याचे दहन करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, निलेश तळेकर, अशोक आदळे, संतोष कोरडे, संतोष हांडे, रोहन आंधळे, सुनील मुळे, विकास भोर, गणेश गोळे, कैलास कोकाटे, वेदांत आंधळे, संजय भोर आदिंसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
  रविना टंडन हीने शेतकरी आंदोलन करताना शेतमालाची नासाडी व सरकारी मालमत्तेचे नुकसान करत असून, त्यांना अटक करुन जामीन न देण्याचे टीव्ट केल्याने त्या वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. शेतीमाल व दूधाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने चालू असलेल्या आंदोलनात आक्रमक असलेल्या शेतकर्‍यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने संतप्त शेतकर्‍यांनी टंडन यांचा पुतळा जाळून संताप व्यक्त केला. तर शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर झोपेचे सोंग घेणार्‍या सत्ताधार्‍यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.   

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad