Our Feeds

बुधवार, ६ जून, २०१८

DNA Live24

भाजपचे 'मातोश्री'समोर लोटांगण; अमित शहा उद्धव ठाकरेंच्या भेटीलामुंबई : DNALive24-
आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली असतांना भाजपचा एक एक मित्रपक्ष सोडून जाऊ लागला आहे. त्यामुळे मित्रपक्षाची मनधरणी करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला थेट मातोश्रीवर आले आहेत. राज्यात शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्याने अडचणी वाढत असून, त्यामुळेच भाजपने शिवसेनेसमोर लोटांगण घातल्याचे दिसून येत आहे.
मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मोताश्रीवर दाखल झाले आहेत. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. मागच्या चारवर्षांपासून शिवसेना-भाजपा युतीमध्ये निर्माण झालेली कटुता संपवण्यात अमित शहांना यश येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापुढे भविष्यात सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. शिवसेना आता माघार घेऊन भाजपाशी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करणार का ? मातोश्रीवरुन आज युतीसाठी सकारात्मक संदेश जाणार का ? याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

भेटीबाबत उत्सुकता असली तरी, शहा यांच्या स्वागतासाठी मातोश्रीवर गुजराथी पद्धतीचे ढोकळा, खांडवी हे पदार्थ ठेवण्यात आले आहे. शहा यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपा-शिवसेना युती होणारच, मित्र पक्षांमध्ये आपसात कुरबुरी होत असतात असे म्हटले आहे. २०१९ च नाही तर २०२४ ची निवडणूकही शिवसेनेसोबत लढवू. उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन त्यांची नाराजी दूर करु असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »