हार्दिक पंड्या गेला 'या' अभिनेत्रीसोबत 'डेटिंग'ला!


मुंबई : DNALive24-टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री एली अवराम यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा संपत नाही तोच हार्दिक पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं म्हटलं जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री एशा गुप्तासोबत हार्दिकचं नाव जोडलं जात आहे.

नुकत्याच झालेल्या एका पार्टीमध्ये एशा आणि हार्दिक यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं चित्र आहे. सध्या दोघांनी 'चोरी चोरी चुपके चुपके'च आपलं डेटिंग सुरु केल्याचं म्हटलं जात आहे.

अभिनेत्री एशा फेमिना मिस इंडियाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. जन्नत 2 चित्रपटातून 2012 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने हमशकल्स, रुस्तम, बादशाहो सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच ती 'पलटण', हेराफेरी 3, आँखे 2 या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

स्टार क्रिकेटपटू असलेल्या हार्दिक स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री एली अवरामच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. खरंतर हार्दिक किंवा एली, या दोघांपैकी कोणीही आपलं अफेअर असल्याचं खुल्लमखुल्ला सांगितलं नव्हतं. त्यामुळे साहजिकच आपल्या ब्रेकअपबद्दल ते उघडपणे बोलणार नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या