शेतकरी संपाचा दुसरा दिवस; भाजीपाल्याचे भाव कडाडले


मुंबई : DNALive24-
राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या दहा दिवसांच्या शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद असल्याने राज्यात ठिकठिकाणी भाजीपाला महाग झाला आहे. किसान महासंघाच्या घोषणेप्रमाणे राज्यातले शेतकरी 10 जूनपर्यंत संपावर असतील. या संपात देशभरातील सुमारे 120 शेतकरी संघटना सहभागी आहेत.

शेतकरी संपाला महाराष्ट्रातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरी भागातही याचा परिणाम जाणवू लागला आहे. मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये आज नेहमीपेक्षा निम्म्याच भाजीपाला गाड्या दाखल झाल्या. त्यामुळे मार्केटमध्ये भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत.

पुढील दहा दिवस हा संप जर सुरु राहिल्यास भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतील आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावरच होणार आहे. त्यामुळे या संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी भाजी व्यापाऱ्यांनी केली आहे.


संपाच्या पहिल्याच दिवशी खेड-शिवापूर टोलनाक्यावर हजारो लीटर दूध रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध करण्यात आला. मागील वर्षी झालेल्या शेतकरी संपाचे केंद्रबिंदू ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यात शुक्रवारी शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारचं श्राद्ध घातलं. त्याचबरोबर ग्रामपंचायतीवर काळी गुढी उभारुन सरकारचा निषेध केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या