भारतीय रेल्वेत ८६०० जागांची मेगाभरतीदिल्ली : DNALive24-

भारतीय रेल्वे बोर्डाने सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या 8624 जागांसाठी websiteconstable.rpfonline.org या ऑफिशिअल वेबसाईटवर नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. या वेबसाईटवर 1 जून ते 30 जून 2018 या काळात अर्ज करता येईल. बेरोजगार असलेल्या युवक, युवतींसाठी ही मोठी संधी देण्यात आली आहे.

यावर्षी रेल्वेमध्ये एक लाखांपेक्षा जास्त जागा भरण्यात येणार आहेत. नव्या नोटिफिकेशननुसार, रेल्वे सुरक्षा दलात 9739 कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षकपदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. रेल्वेच्या वेबसाईटवर या दोन्ही जागांसाठी अर्ज करता येईल.

एकूण जागा आहेत : 8624

त्यापैकी पुरुष कॉन्स्टेबल : 4408

तर महिला कॉन्स्टेबल : 4216

अर्ज करण्यासाठी अशी आहे पात्रता

अर्जदार भारतीय नागरिक असावा

अर्जदार कोणत्याही बोर्डातून दहावी पास असावा

वयोमर्यादा :

या जागांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचं किमान वय 18 वर्षे, तर कमाल वय 25 वर्ष असणं गरजेचं आहे. आरक्षित वर्गांना नियमानुसार सूट दिली जाईल.

अशी होणार निवड

अगोदर ऑनलाईन लेखी परीक्षा

त्यानंतर शारीरिक चाचणी

या दोन्ही प्रक्रिया पास झाल्यानंतर उमेदवाराला कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाईल.

या वेबसाईटवर अर्ज भरता येणार

www.indianrailways.gov.in

अर्ज शुल्क :

जनरल/ओबीसी – 500 रुपये

एससी, एसटी, महिला, अल्पसंख्यांक, ईबीसी – 250 रुपये

अशा आहेत तारखा :

अर्ज भरण्याची सुरुवात : 1 जून

अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 30 जून

ऑनलाईन फी भरण्याची अंतिम तारीख : 2 जुलै

ऑफलाईन फी भरण्याची अंतिम तारीख : 5 जुलै

हॉलतिकीट मिळणार परीक्षेच्या दहा दिवस अगोदर

परीक्षा  सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2018.