Our Feeds

शनिवार, २ जून, २०१८

DNA Live24

वेटलिफ्टर संजिता चानू डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने निलंबितदिल्ली: DNALive24-
२०१४ आणि २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई करणारी भारताची वेटलिफ्टर संजिता चानू डोपिंगमध्ये (उत्तेजक चाचणी) दोषी आढळली आहे. त्यामुळे तिच्यावर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनकडून तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

तिच्या नमुन्यात टेस्टॉस्टेरॉनचे अंश सापडले आहेत. संजिताकडून हा नमुना कधी घेण्यात आला होता याची माहिती अजूनही मिळालेली नाही.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिला तेराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत संजिता चानूनं ५३ किलो वजनी गटाचं सुवर्णपदक पटकावलं होतं. २०१४ साली ग्लास्गोत ती ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती.

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत संचिता चानूने विक्रम रचला होता.  संजिता चानूने 192 किलो किलो वजन उचलत भारताला सुवर्ण मिळवून दिलं, जो एक विश्वविक्रम आहे.

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »