किस्मतवालोंको ही मिलती है पनाह दोस्तों के दिल में..

किस्मत वालों को ही मिलती है
पनाह दोस्तों के दिल में,
यूँही हर शख्स
जन्नत का हक़दार नहीं होता…."

खरंय ना हे अगदी..? 
इतकं सोप्पं नसतं खरे मित्र मिळणं.. आणि खऱ्या मित्रांची ओळख आपल्या कठीण परिस्थितीत होत असते, हेही तितकंच खरं आहे. 

हरिवंशराय बच्चन म्हणतात ते अगदी खरंच की.. 

"गिरना भी अच्छा होता हैं,
औकात का पता चलता हैं..
बढते हैं जब हाथ उठाने को,
अपनोंका पता चलता हैं.."?

अन् हे जे अपने असतात ना, हेच तर आपले खरे मित्र असतात. माणसानं जगात हजारो नाती बनवावीत, पण त्या हजारो नात्यांत एक नातं असं असावं, ज्यावेळी हजारो लोक आपल्या विरोधात असतील तेव्हा त्या एक नात्यानं आपल्या पाठीशी उभं राहावं.

शाळेत असताना हे नातं कट्टीबट्टीचं असतं. अन पाहता पाहता कधी या नात्यांची 'दिल दोस्ती दुनियादारी' होते समजतही नाही.. आपले मित्र हेच आपले जग होऊन जातात. आयुष्यातले अनेक अवघड निर्णय घेताना हे मित्र आपल्या पाठीशी सावलीसारखे उभे राहतात. अगदी नैराश्याने आपण ग्रासलेले असतो, अन आपला जिवलग मित्र आपल्या एका स्माईलसाठी धडपडतो. 

अन आपणही आपलं दुःख विसरून फक्त मित्राच्या धडपडीसाठी आपलं मन मोकळं करतो. आपल्या अडचणी मांडतो. अन मग त्या अडचणींवर मात करण्यासाठी मित्राकडून येते सोल्युशन्सची यादी. यातले अनेक सोल्युशन्स तर ऐकूनच हसू येतं अन आपले प्रॉब्लेम्स कुठं पळून गेले हे आपल्यालाही समजत नाही.. 

हे मित्र म्हणजे ना अजबच रसायन असतंय बघा.. आपल्या जीवनाला सुंदर बनवणारे आणि जगण्याची मजा वाढवणारे हेच तर कार्टून्स असतात आणि मुलांनी फक्त मुलांशी मैत्री करावी, मुलींनी फक्त मुलींशी मैत्री करावी असंही काही नसतं बरं का.. 

एक मुलगा आणि एक मुलगी सुद्धा या मैत्रीच्या नात्याला सुंदर न्याय देऊ शकतात.. खास करून कॉलेजेस आणि ऑफिसेसमध्ये अशी सुंदर मैत्री नेहमी पाहायला मिळते.. या नात्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, अनेक कवी, लेखक या सुंदर नात्याचं वर्णन करताना थकत नाहीत.. तर अशा या जानसे भी प्याऱ्या दोस्तांना माझा सलाम आणि सर्वांना मैत्रिदिनाच्या शुभेच्छा. 

- प्राची सोनवणे
(लेखिका चाईल्डलाईन अहमदनगरच्या टीम लीडर आहेत)