घोडेगावात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले


अहमदनगर । DNA LIVE24 - नेवासे तालुक्यात राजकीय दृष्ट्या संवेदनशील तसेच महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडेगाव येथील ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ५ संप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यामुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवाय आगामी सरपंचपद हे थेट जनतेतून निवडून दिले जाणार असल्याने यंदाच्या निवडणुकीत आणखीनच रंगत आली आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

राज्यातील जून ते सप्टेंबर २०१८ महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींसाठी २६ मे रोजी मतदान होणार असून ५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीमधील १२४ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक सुद्धा २६ सप्टेंबर रोजी होणार आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

नेवासे तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार असून यात घोडेगाव ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी ५ ते ११ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. १२ सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तर, अर्ज मागे घेण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर १२ सप्टेंबर रोजीच निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर २६ सप्टेंबर रोजी मतदान व २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

जनतेम्ये असंतोष - घोडेगाव हे नेवासे तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील गाव आहे. त्यामुळे घोडेगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी व आघाड्यांनी कंबर कसली आहे. घोडेगावात बहुतांश वार्डात विकासकामे झालेली नसल्याने ग्रामस्थ मात्र प्रचंड नाराज आहेत. ग्रामस्थांचा हा असंतोष निवडणुकीच्या माध्यमातून बाहेर पडण्याची शक्यता चौका-चौकात चर्चिली जात आहे.

 (आम्हाला फेसबुक वर लाईक करा)