बोल्हेगावात राष्ट्रवादीला मोठा झटका; निलेश भाकरे शिवसेनेत


नगर | DNA Live24 - साडेचार वर्षामध्ये नगर शहरामध्ये तुम्ही काय दिवे लावले हे यांना जनतेने विचारले पाहिजे. शिवसेनेने कोणाच्या जमिनी घेतल्या नाही. जागा बळकावल्या नाही. कोणाच्या फ्लॅटमध्ये घुसलो नाही. कोणाच्या कंपन्या घेतल्या नाही. कोणालाही आत्महत्येला परावृत्त केले नाही. हे आम्ही कधीच केले नाही. शिवसेनेने जनतेला दिले ते प्रेम, शिवसेनेने दिले सौंरक्षण, शिवसेनेने केलेले काम हे आपल्या डोळ्यासमोर आहे. चार वर्षापासून नगर शहराला जो काळा रंग पडला आहे तो आपल्याला बदलायचाय, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

राष्ट्रवादीचे निलेश भालचंद्र भाकरे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, घनश्याम शेलार, महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, सभागृहनेते गणेश कवडे, युवा सेना जिल्हाध्यक्ष रवी वाकळे, शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर, संग्राम शेळके, संभाजी कदम, अशोक बडे, दत्ता सप्रे, भालचंद्र भाकरे, उपस्थित होते.

तसेच यावेळी नागरदेवळे ग्रा. पं. सदस्य कुंदन जाधव, अक्षय कातोरे, दशरथ शिंदे, दिपक खैरे, मदन आढाव, काका शेळके, मुन्ना भिंगारदिवे, सचिन राऊत, अंबादास कराळे, जेम्स आल्हाट, रावसाहेब म्हस्के, धर्मा जाधव, प्रा.अंबादास शिंदे, वैशाली भाकरे, संजय चांदणे, संदिप शिंदे, प्रमोद भोसले, किरण काळे, विकास गायकवाड, सुनिल काळे, बंटी भाकरे, विकी भाकरे, विशाल साबळे, केतन पाटोळे, संतोष पाटोळे, भावेश जाधव, प्रशांत भोसले, सुनिल वाघमारे, योगेश सिंगाडे, शुभम भाकरे, सुमित ठोसर, कुणाल कासार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

राठोड म्हणाले की, या भागामध्ये शिवसैनिकांनी शिवसेनेचे एक मोठे वर्चस्व, वलय निर्माण केले. तरून वर्ग या शिवसेनेमध्ये वाढत आहे. याचे उदाहरण हे निलेश भाकरे आहे. भाकरे जर या पूर्वीच शिवसेनेत आले असते तर आज एखाद्या पदावर आपण पहिले असते. नगर शहरात एक वेगळा इतिहास घडतोय याठिकाणी शिवशक्ती आणि भीमशक्ती एक आहे. हे चारही उमेदवार या भागामध्ये निवडून येणारी आहेत.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी संघटना म्हणजे शिवसेना. काही लोक म्हणतात तुम्ही २५ वर्षामध्ये काय केले. खरे म्हणजे जनतेने २५ वर्ष तुम्हाला बाजूला ठेवले, दूर ठेवले. साडेचार वर्षात काय झालेले या नगर शहरामध्ये हे तुम्हाला सांगण्याची आवशकता नाही. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने या नगर शहराचे बिहार केले. सामान्य लोकांना जनतेला नगर शहरामध्ये शांतता पाहिजे. लोकांना संरक्षण भेटले पाहिजे.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)