नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयास पुषोत्तम करंडकपुणे | DNA Live24 - कलोपासक संस्थेने पुणे येथे घेतलेल्या राज्यस्तरीय पुरषोत्तम एकांकिका स्पर्थेत अव्वल ठरलेली नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने सादर केलेल्या पिसिओ एकांकिकेस आज सायंकाळी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते करंडक प्रदान करण्यात आला.

पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात झेलेल्या शानदार सोहळ्यात हा मनाचा करंडक सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. बक्षिस समारंभा पूर्वी विजेत्या पिसिओ एकांकिकेचे सादरीकरण झाले. खचाखच भरलेल्या सभागृहातील रसिकांनी भरभरून दाद या सादरी करणास दिली. यावेळी कलोपासक संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकर, सचिव राजेंद्र ठाकूर, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, प्राचार्या डॉ.अमरजा रेखी, जेष्ठ रंगकर्मी पी.डी.कुलकर्णी, प्रा.अतुल कुलकर्णी, प्रा. मंगेश जोशी, मेघना फडणीस, विनायक पावले, ऋता ठाकूर आदींसह कलाकार उपस्थित होते.

यावेळी कीर्ती शिलेदार यांनीही या एकांकिकेचा आस्वाद घेतला. आपल्या भाषणात त्यांनी पिसिओचे भरभरून कौतुक केली. त्या म्हनाल्या, पूरशोत्त्म स्पर्धा फार चांगल्या वातावरणात होत आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थी उत्कृष्ठ सादरीकरण करत आहेत. यावर्षी अव्वल ठरलेली पिसिओ एकांकिका ख-या अर्थाने अव्वल आहे. सर्व कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे. अत्यंत साधा विषय निवडून मध्यमवर्गीय कुटुंब सादर केले आहे. साधेपणाची नजाकत जपत केलेले हे सादरीकरण उत्कृष्ठ्च आहे. अशा शुभेच्छा देल्या.

यावेळी स्पर्धेचे परिक्षक केशव साठे यांनीही पिसिओ चे कौतुक केले. या पेमराज सारडा महाविद्यालयातील उत्कृष्ठ दिद्ग्दर्षक गणपतराव बोडस पारितोषिक विजेते विनोद गरुड, सर्व उत्कृष्ठ अभिनय पारितोषिक नटवर्य केशवराव दाते करंडक विजेती मोनिका बनकर, काकाजी जोगळेकर पारितोषिक विजेते अविष्कार ठाकूर आदींसह सर्व सहभागी कलाकारांना  मानाचा पुरषोत्तम करंडक प्रदान करण्यात आला.

करंडक घेण्यासाठी सर्व कलाकार वारक-यांचा पोशाख करून दिंडी काढून स्टेजवर आले. यावेळी सर्व कलाकारांनी जल्लोष करून आनंद साजरा केला