ऐतिहासिक लोखंडी पुलाचे लवकरच सुशोभिकरण : खा.दिलीप गांधीनगर : DNALive24-
सिना नदीवरील जुना ऐतिहासिक लोखंडी पुलाचे लवकरच सुशोभिकरण करणार असून, या ठिकाणी अत्याधुनिक आकर्षक दिवेही लावणार आहोत, अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली.

शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत सक्कर चौक, कायनेटिक चौक, मल्हार चौक आदि भागांमध्ये सकाळी स्वच्छता मोहिम राबविण्या आली. तसेच लोखंडी पुलाजवळ मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बाभळीची झाडे व इतर गवत तातडीने काढण्याच्या सूचना ठेकेदाराला करण्यात आल्या. या ऐतिहासिक लोखंडी पुलाची आकर्षक रंग-रंगोटी करुन आकर्षक पथदिवेही लावण्यात येणार आहेत.

कायनेटिक चौकात खा.दिलीप गांधी यांनी चेतक एंटरप्राईजेसचे प्रकल्प संचालक सुनिल भोसले यांना सूचना करत कायनेटिक चौकातील सर्व रस्ते खड्डेमुक्त तसेच साईट पट्या व्यवस्थीत करण्याच्या सूचना केल्या. अनेक ठिकाणी वाढलेले गवतही काढण्याच्या सूचना केल्या.

यावेळी गटनेते सुवेंद्र गांधी, संघटन सरचिटणीस किशोर बोरा, सरचिटणीस जगन्नाथ निंबाळकर, उपाध्यक्ष श्रीकांत साठे, भिंगार अध्यक्ष शिवाजी दहिंडे, धनंजय जामगांवकर, नाना भोरे, नंदा कुसळकर, मिलिंद भालसिंग, राहुल रासकर, उमेश साठे, दिपक उमाप आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.