दरोड्याच्या तयारीत निघालेली सराईत आरोपींची टोळी जेरबंद


नगरसह शेजारच्या जिल्ह्यातील घरफोडीचे दुर्लक्षित गुन्हे आले उघडकीस

अहमदनगर । DNA Live24 -दरोड्याच्या तयारीत असलेल्या नऊ सराईत दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर मनमाड रोड वरील निंबळक बायपास चौकात ताब्यात घेतले. या टोळीने नगरसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल एक तलवार एक कुऱ्हाड, तीन सुरे, एक स्क्रू ड्रायव्हर,  मास्टर चावी, धार लावण्याचा फरशी सारखा दगड तसेच दोन चार चाकी वाहने जप्त केली आहेत. या टोळीने आतापावेतो २० हुन अधिक घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)


हार्दिक सिंग बबलू सिंग टाक (वय 22, राहणार गुरुगोविंद सिंग नगर, जालना), गजानन सोपान शिंगाडे (वय 25 राहणार पाचन वडगाव जालना), संजय ऊर्फ गण्या शंकर डहाणे (वय 22 राहणार सारोळा बद्दी तालुका नगर), किसन होलसिंग टाक (राहणार संजय नगर, काटवण खंडोबा रोड, अहमदनगर शहर), रिजवान राजू शहा ( 15 राहणार बोलेगाव) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तर राजेश टाक सुनील सिंग जुनी किशोर व गणेश हे फरार झाले आहेत.

नगर मनमाड रोड ने एका तवेरा कार मधून काही दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी नगर शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरील आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन खामगळ, सहाय्यक फौजदार नानेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मन्सूर सय्यद, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, मोहन गाजरे, सचिन अडबल, सुरेश माळी, भाऊसाहेब काळे, मनोज गोसावी, अशोक गुंजाळ, रवींद्र कर्डिले, संतोष लोंढे, किरण जाधव, संदीप दरंदले, सचिन कोळेकर, आदींचे टीमने ही कामगिरी केली.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

निंबळक बायपास चौकामध्ये पोलिसांनी संशयास्पद तवेरा कार अडवली असतात तीन ते चार दरोडकर अंधाराचा गैरफायदा घेत पळून गेले. तर ५ जणांना पोलिसांनी पकडले. यावेळी चोर पोलिसांच्या पाठलागाचे थरारनाट्य रंगले होते. अखेरीस पोलिसांनी पकडलेल्या आरोपींच्या ताब्यातून एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात दरोडा टाकण्याचे साहित्य, काही रोकड व चोरीच्या चारचाकी वाहनांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याच्या प्रयत्नात असल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांच्या चौकशीत पकडलेले आरोपी हे सराईत घरफोडी करणारे गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. हरदीप सिंग टाक याच्याविरुद्ध जालना जिल्ह्यात तीन घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी गजानन शिंगाडे याच्याविरुद्ध जालना जिल्ह्यात एक खुनाचा, एक चोरीचा, तर एक दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल आहे. आरोपी सुनील सिंग जुनी याच्या विरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. एखाद्या ठिकाणाहून चारचाकी मोटार चोरायची, त्यात बसून दुसऱ्या शहरात जाऊन घरफोड्या करायच्या, अशी पकडलेल्या टोळीची मोडस ऑपरेंडी होती. मात्र अखेर नगरच्या एलसीबी टीमने त्यांना जेरबंद केले.

याशिवाय वरील आरोपींसह नेवासा फाटा येथील एका साथीदारांनी यापूर्वी नगर जिल्हा पुणे शहर व बीड जिल्ह्यात चोरून आणलेल्या वेगवेगळ्या वाहनांतून घरफोडी व चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. या आरोपींविरुद्ध येरवडा, भोसरी, सुपा, सोनई, कोतवाली, आष्टी, श्रीगोंदा, नेवासा आणि इतर काही पोलिस ठाण्यांमध्ये घरफोडी चोऱ्याचे गुन्हे दाखल आहेत. सध्या पकडलेले दरोडेखोर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व फौजदार सिद्धेश्वर गोरे हे त्यांची अधिक कसून चौकशी करीत आहेत.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)
.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या