Our Feeds

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

DNA Live24

गोवंश कत्तल करणारी कसायांची टोळी जिल्ह्यातून हद्दपार


अहमदनगर | DNA Live24 - संघटितरीत्या अवैधपणे गोवंश हत्या करून, अवैधपणे गोमांसाची विक्री करणारी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आली आहे. अतिक गुलामहुसेन कुरेशी याच्यासह पाच जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. या टोळीविरुद्ध श्रीगोंदे पोलीस ठाण्यात नऊ गुन्ह्यांची नोंद आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

अतिक गुलामहुसेन कुरेशी ( रा. कसाई मोहल्ला) याच्यासह अन्वर गुलाब सय्यद ( शनि चौक), रमजू इसाक कुरेशी ( बस स्थानकाजवळ), मूनफ गुलाबहुसेन कुरेशी (कसाई मोहल्ला) व बाबू अशपाक कुरेशी ( कसाई गल्ली) अशी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना दिनांक १५ सप्टेंबरपासून दोन वर्षांकरिता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

या टोळीविरुद्ध श्रीगोंदे पोलीस ठाण्यात अवैधपणे जनावरांची कत्तल करणे, गोमांस विक्री करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अवैधपणे जमाव गोळा करून दंगल करणे, खंडणी उकळणे आधी कलमान्वये नऊ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी या टोळीविरुद्ध हद्दपार प्रस्ताव तयार करण्याचा आदेश दिला होता.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

त्यानुसार पोलिस अधीक्षक शर्मा, अपर पोलिस अधीक्षक जयंत कुमार मीना व कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय दिलीप पवार श्रीगोंदा पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. श्रीगोंदे तालुक्यात दहशत असलेल्या या टोळीविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याने इतर गुंडांमध्ये व टोळ्यांमध्ये धाक निर्माण झाला आहे.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

इतर टोळ्याही आता रडारवर - संघटित गुन्हेगारी करून जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण करणारे, खंडणी वसूल करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. यापैकी ३० ते ३५ टोळ्याच्या विरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. या टोळ्याही लवकरच हद्दपार होतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »