घोडेगावात ग्रामपंचायत निवडणूक - सत्ताधारी गडाख आणि विरोधक देसरडा यांच्यात चुरशीची लढत

 

अहमदनगर । DNA Live24 - नेवासा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या घोडेगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील चुरस दिवसेंदिवस आणखी रंगत होत चालली आहे. शुक्रवारी दुपारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार मुरकुटे व कर्डिले गटातर्फे सरपंच पदासाठी भरलेले दोन अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे आता सरपंच पदासाठी सत्ताधारी गडाख व विरोधी पार्टीतील देसरडा यांच्यात चुरशीची लढत होत असल्याचे दिसत आहे. यांच्याशिवाय, तब्बल ७ जणांनी या पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी एकूण ९ उमेदवारांमध्ये काट्याची लढत होणार आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

सरपंचपदी विराजमान होण्यासाठी एकूण १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तर सदस्य पदासाठी ७४ अर्ज दाखल झाले होते. शनिवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या ८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्षांसह आता ९ उमेदवार रिंगणात आहेत. इतर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी देखील सत्ताधारी गडाख व विरोधी पार्टीचे देसरडा यांच्यातच चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. काही वार्डामध्ये अपक्षांनीही सदस्य पदासाठी अर्ज भरलेले आहेत. ज्या वॉर्डात अपक्षांचे अर्ज आहेत, तेथे मतांचे विभाजन होऊन नेमका कोणाला फायदा होतो, या चिंतेने सत्ताधारी व विरोधक दोघेही धास्तावलेले आहेत.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

यंदा सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार आहे. सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये विरोधी पार्टीतर्फे राजेंद्र दगडुलाल देसरडा, सत्ताधारी पार्टीतर्फे राम नामदेव सोनवणे, वंचित बहुजन आघाडीतर्फे सुधीर नाथा वैरागर, यांच्यासह प्रशांत भानुदास लोंढे, यादवराव माधवराव लोखंडे, सुधीर संभाजी सोनवणे, गोपीनाथ जानकू हुलहुले, मनोज गोकुळदास नहार व अशोक येळवंडे यांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी रिंगणात उरलेल्या उमेदवारांची संख्या पाहता अर्ज माघारी घेताना सत्ताधारी पक्षाला इच्छुकांची मनधरणी करणे जड गेल्याचे दिसून आले.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी तिसऱ्या आघाडीतर्फे सरपंचपदासाठी दाखल झालेले सचिन चोरडिया व सुहास गोंटे या दोघांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर निवडणूक रिंगणात उरलेल्या उर्वरित उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली. उमेदवारांना चिन्ह वाटप देखील झाले. आता प्रत्यक्ष मतदान २६ सप्टेंबरला होणार असून २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. ए. डी होडगर हे काम पाहत आहेत.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

वॉर्डनिहाय उमेदवारांची नावे - वार्ड क्रमांक १ मध्ये - मच्छिंद्र भास्कर कदम विरुद्ध संदीप रामदास शेंडगे, सुनील अंबादास तांबे विरुद्ध यशवंत पुनाजी येळवंडे, जनाबाई अशोक टेमकर विरुद्ध मनीषा विजय टेमकर. वार्ड क्रमांक २ मध्ये - निसार दाऊदभाई सय्यद विरुद्ध रवींद्र सावळेराम आंग्रे विरुद्ध सुरेश दौलत वैरागर. निर्मला बाबासाहेब वैरागर विरुद्ध सिंधू मनोहर वैरागर.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

वार्ड क्रमांक ३ मध्ये - सोमनाथ सुधाकर काकडे विरुद्ध किरण रमेश ब-हाटे विरुद्ध पंकज चंद्रसेन लांभाते. सुंदरबाई म्हातारदेव इखे विरुद्ध संगिता राजेंद्र येळवंडे. वैशाली दिलीप काळे विरुद्ध वंदना राजेंद्र सोनवणे. वार्ड क्रमांक ४ मध्ये - रवींद्र बाळासाहेब कदम विरुद्ध राजू आंद्रेस पाटोळे, सुनिता संदीप येळवंडे विरुद्ध मीना दादासाहेब सोनवणे, ऋतुजा शरद सोनवणे विरुद्ध हर्षदा अनिल सोनवणे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

वॉर्ड क्रमांक ५ मध्ये - पारस शांतीलाल चोरडिया विरुद्ध पारसकुमार चंपालाल नहार, रमेश रंगनाथ जाधव विरुद्ध ज्ञानेश्वर बहिरू गाडेकर, अस्मिन अल्ताफ शेख विरुद्ध शाहीनाज जाकीर शेख. आणि वार्ड क्रमांक ६ मध्ये - संजय मारुती आढाव विरुद्ध प्रशांत भानुदास लोंढे विरुद्ध वसंत नारायण सोनवणे, सविता मधुकर आल्हाट विरुद्ध मीना योसेफ बर्फे विरुद्ध अमृता सचिन लोंढे, रोहिणी शिवाजी इखे विरुद्ध लक्ष्मी विष्णू गि-हे.

घोडेगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या
 ताज्या घडामोडींसाठी वाचत राहा 
DNA Live24 डॉट कॉम न्यूज पोर्टल.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)