घोडेगावात ग्रामपंचायत सरपंच होण्यासाठी १६ उमेदवारांचे अर्ज

अहमदनगर । DNA LIVE24 - नेवासा तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या घोडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान होण्यासाठी सोमवारी सायंकाळपर्यंत १६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आहे. यंदा घोडेगावचे सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार आहे. यंदा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन प्रमुख पॅनलमध्ये सरळ सरळ लढत होत असल्याने या निवडणुकीत रंगत वाढली आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांच्या नेतृत्वाखालील पॅनल मोठ्या तयारीनिशी आणि ताकदीनिशी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. या पॅनलतर्फे सरपंचपदाचे उमेदवाराचे नाव सुमारे सहा महिन्यापूर्वीच चर्चेत होते. तसेच वॉर्डरचना जाहीर होताच प्रत्येक वॉर्डातील उमेदवारही निश्चित झालेले होते. यापैकी सरपंपदासाठी दोघांनी, तर सदस्य होण्यासाठी बहुतांश उमेदवारांनी मंगळवार सायंकाळपर्यंत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

सत्ताधारी पॅनलतर्फे यंदा इच्छुकांची संख्या अधिक होती. सरपंचपदासाठीही अनेक जण इच्छुक होते. त्यामुळे सरपंचपदाचा नेमका उमेदवार आणि प्रत्येक वॉर्डातील उमेदवार निवडताना सत्ताधारी पॅनलची मोठी दमछाक झाली. वरीष्ठ पातळीवर अनेक बैठका घ्याव्या लागल्या. उमेदवारी मिळाली नाही तर थेट अपक्ष अर्ज भरून निवडणूक रिंगणात उतरण्याचा इशाराच इच्छुकांनी दिलेला होता. त्यामुळे उमेदवारांची मनधरणी करताना श्रेष्ठींच्या नाकीनऊ आल्याचे दिसून आले.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

११ सप्टेंबरला अर्ज भरण्याची अखेरची मुदत आहे. १२ व १३ सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी होईल. अर्ज माघारीसाठी १४ सप्टेंबरची रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर १५ सप्टेंबरला निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर २६ सप्टेंबरला प्रत्यक्ष मतदान व २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी आणखी किती इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करतात, याची उत्सुकता आहे.

सरपंचपदाचे इच्छुक उमेदवार - भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष देसरडा यांच्या पॅनलतर्फे राजेंद्र देसरडा व सचिन देसरडा. सध्या सत्ताधारी असलेल्या पॅनलतर्फे दत्तात्रेय बरहाटे, संतोष सोनवणे, राम सोनवणे, शरद सोनवणे, तिसऱ्या आघाडीतर्फे सचिन चोरडिया, अपक्ष म्हणून गोपीनाथ हुलहुले. वंचित बहुजन आघाडीतर्फे सुधीर वैरागर.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)