श्री विशाल गणेश मंदिरात एसपींच्या हस्ते गणेशाची स्थापना


अहमदनगर । DNA Live24 - शहराचे आराध्य दैवत व मानाचा गणपती असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते श्रीगणेश मूर्तीची स्थापना करून सपत्निक पूजा करण्यात आली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शहरात गणरायाचे आगमन होत आहे. गुरुवारी सकाळी प्रथेप्रमाणे विशाल गणेश मंदिरात गणरायाचे आगमन झाले.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

यावेळी श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर व इतर विश्वस्त उपस्थित होते. दरवर्षी श्री विशाल गणेश मंदिरात पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गणेश मूर्तीची स्थापना होते. यंदाही एसपी शर्मा यांच्या हस्ते पूजा करून गणरायाचे आगमन झाले. यावेळी महाआरती देखील करण्यात आली. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, सर्वधर्मीय नागरिकांमध्ये एकोपा टिकून राहावा, अशी प्रार्थना एसपी शर्मा यांनी गणेशाकडे केली.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक रंजनकुमार कुमार शर्मा यांनी सर्व नगरकरांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचा गणेशोत्सव सर्व नागरिकांनी उत्साहात, आनंदात साजरा करावा. मात्र हे करत असताना कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही तसेच शांतता भंग होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन एसपी शर्मा यांनी समस्त नगरकरांना केले आहे. शहरातील तर मानाच्या गणेश मंडळांमध्ये गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)