Our Feeds

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

DNA Live24

पोलिस निरीक्षकांच्या वादग्रस्त वक्तव्याचा आज राज्यभर निषेध


अहमदनगर । DNA Live24 - श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर वाळूतस्करांनी प्राणघातक हल्ला केल्यानंतर स्थानिक पोलिस निरीक्षकाने एका कार्यक्रमात महसूल अधिकाऱ्यांबद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. त्यावरून महसूल आणि पोलीस विभागात वादाची ठिणगी पडली आहे. आज  महसूल विभागातर्फे राज्यभरात या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला जाणार आहे.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

आपल्या वक्तव्यामुळे महसूल अधिकाऱ्यांचा रोष ओढवून घेतलेले पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यावर महसूलची अद्यापही नाराजी आहे. वाळू चोरीच्या गुन्ह्याचा तपास काढून घेऊनही पीआय पोवार अद्याप या तपासात हस्तक्षेप करत असल्याचा अारोप महसूल अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा आज शुक्रवारी महसूल विभाग राज्यभर निषेध करणार आहे.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

महसूल विभागाला अद्ययावत नवीन वाहने आणि कायम स्वरूपी म्हणजेच हत्यारी पोलिस बंदोबस्त मिळाल्याशिवाय विनाकारण आपला जीव धोक्यात घालून वाळू तस्करी रोखण्यासाठी कुठलीच कार्यवाही न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ तसेच महसूल अधिकारी कर्मचारी संघटना या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कार्यलयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण सिंग परदेशी यांची लवकरच भेट घेणार आहेत.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

दाणेज यांच्यावरील हल्ल्याच्या सुनावणीला सर्व महसूल अधिकारी न्यायालयात हजर राहणार आहेत. आरोपींना अटक केल्यानंतर श्रीगोंदा येथील न्यायालयात हजर केले, तेव्हा सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी हजर होते. शुक्रवारी वादग्रस्त पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभर निषेध केला जाणार आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष पथक ऑक्टोबर महिन्यात नगरमध्ये येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी सांगितले आहे.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »