अकोळनेर व साकतमध्ये दारु अड्ड्यांवर पोलिसांचे छापे


अहमदनगर । DNA Live24 - गणरायाच्या आगमनाच्या दिवशी भल्या पहाटे नगर तालुक्यातील अकोळनेर व साकत या दोन गावात गावठी हातभट्ट्यांवर पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक केला. एकूण तीन ठिकाणी टाकलेल्या रेडमध्ये सुमारे ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट व जप्त करण्यात आला आहे.  पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे व सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

अकोळनेर व साकत गावात गावठी हातभट्ट्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच देशी विदेशी दारुची विक्री होत असल्याची देखील माहिती होती. त्यामुळे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक जयंतकुमार मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी सागर पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली एपीआय  किरण शिंदे यांनी सहकाऱ्यांसह गुरुवारी भल्या पहाटे दारू अड्ड्यांवर रेड टाकली.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

रेडमध्ये तिन्ही ठिकानांहुन गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात सोमनाथ नारायण पवार (रा. साकत, ता.नगर), सोपान हरी पवार (रा. साकत, ता.नगर) आणि विपुल अर्जुन शेळके (रा. अकोलनेर, ता.नगर) यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात अवैध धंद्यांवरील कारवाया सुरूच राहणार असल्याचे एपीआय शिंदे यांनी सांगितले आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)