Our Feeds

शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

DNA Live24

सरकारने सर्वसामन्यांचे जगणे मुश्कील केले : विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे


नगर : 
 केंद्र शासनाने व राज्य सरकारने सामान्य नागरिकांचे जगणे  मुश्कील केले आहे. सरकारचे अनेक घोटाळे पुढे येत आहे. सरकारने कृषिमूल्य आयोगाची अंमलबजावणी केली नाही. शेतकर्‍यांना दीडपट हमीभाव घोषणा नुसता नावालाच आहे. त्याचा कोणताच उपयोग सामान्य नागरिकांना होत नाही. लोकांचा या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. कॉंग्रेसने राज्यात संघर्ष यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला अनेकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नगर महानगरपालिका निवडणुकीबाबत कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची लवकरच बैठक होणार आहे. महापालिका निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसमध्ये आघाडी करण्याचा आमचा आग्रह राहणार असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी केले.

शुक्रवारी (दि. ७) नगरमध्ये आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात विखे बोलत होते. यावेळी आ. सुधीर तांबे, आ. भाऊसाहेब कांबळे, अण्णासाहेब म्हस्के, प्रभारी जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, माजी आ. नंदकुमार झावरे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जगगनाथ राळेभात, सपंत म्हस्के, सुरेश करपे, हेमंत उगले, दीप चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

विखे म्हणाले की, दोन कोटी नोकर्‍या उपलब्ध होतील असे सरकारने सांगितले होते. प्रत्यक्षात दोन लाख लोकांना सुद्धा नोकर्‍या उपलब्ध झाल्या नाही. व्यापरी उद्ध्वस्त झाला. नोटबंदीमुळे रोजगाराच्या संधी गेल्या. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. याच्या निषेधार्थ देशात व राज्यात सप्टेंबरला भारत बंदचे आयोजन केले आहे. व्यापारी नागरिकांकडून सहकार्य करण्याची गरज आहे. या बंदमध्ये राष्ट्रवादी देखील सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले.

पेट्रोल दरवाढीच्यामागे मोठे राजकारण लपले आहे. निवडणुका जवळ आल्या की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करायचे. निवडणुका नसल्या की वाढवायचे. नगर एमाडिसी परिसरातील भूसंपादनाला शेतकर्‍यांनी विरोध केला आहे. त्यावर विखे म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी भूखंड घोटाळा झालेला आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या जमीन घेऊ नये. अनेक ठिकाणी भूसंपादन केले जाते मात्र, याठिकाणी काहीच होत नाही, असा आरोप विखे यांनी केला.

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग यांनी दक्षिण मतदारसंघ कॉंग्रेसला द्यावा या मताचे स्वागत आहे. लोकसभेच्या जागेबाबत अद्याप राष्ट्रवादीशी चर्चा झालेली नाही. मात्र, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुढील आठवड्यात दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक होईल. त्यावेळी नगरच्या जागेचा विषय निघाल्यास काय होते ते पाहू, असेही विखे म्हणाले.

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »