ट्रक चालकांना मारहाण करून लुटणारी माक्यातील दरोडेखोरांची टोळी गजाआड


अहमदनगर । DNA Live24 - ट्रक चालकांना रस्त्यात अडवून, त्यांना बेदम मारहाण करून लूटमार करणाऱ्या दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली आहे. दरोडेखोरांकडून चोरीचे दोन मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये नेवासा तालुक्यातील माका येथील युवकांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील ट्रक चालक प्रदर्शन पंत हा लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक घेऊन जामखेड येथून जात होता. अज्ञात चार आरोपींनी त्याच्या ट्रकचा पाठलाग करून त्याच्या ट्रकला इंडिका कार आडवी लावली. चालकाला एअरगनचा दाखवत मारहाण करून ट्रकच्या काचा फोडल्या. दरोडेखोरांनी त्याच्या जवळ असलेले रोख साडेसहा हजार रुपये, ११ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल, असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी ट्रक चालकाचे फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला आला होता.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

जामखेड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसही या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. या गुन्ह्यातं नेवासा तालुक्यातील माका येथील आरोपींचा समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त खबऱयांद्वारे मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने नेवासे तालुक्यात शोध मोहीम राबवून चौघा जणांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देत चोरलेल्या मुद्देमालही पोलिसांच्या हवाली केला. 

या पोलिसांची कामगिरी - स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली फौजदार गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार नाणेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज गोसावी, मन्सूर सय्यद, विजय वेठेकर, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, संदीप घोडके, संदीप पवार, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, विजय ठोंबरे, अशोक गुंजाळ, मेघराज कोल्हे, चालक संभाजी कोतकर आदींच्या टीमने ही कामगिरी केली.

शरद नारायण बरे  (वय 21 राहणार माका तालुका नेवासा) याला पोलिसांनी सुरुवातीला ताब्यात घेतले. नंतर त्याचे साथीदार अमोल अण्णासाहेब लोंढे, दीपक गणेश गुगळे, प्रशांत पंढरीनाथ खोसे व सौरभ शुभम चोरमले ( सर्व राहणार माका, तालुका नेवासा) यांनाही ताब्यात घेण्यात आले. चौघांकडून चोरलेल्या मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना जामखेड पोलिसांच्या हवाली केले आहे. अधिक तपास जामखेड पोलिस करीत आहेत. 

लूटमार करणे नेहमीचा उद्योग - जामखेड येथील ट्रकचालकाच्या लूट प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांनी यापूर्वीही लूटमार केल्याची कबुली दिली आहे. निवासी कर्जत जामखेड बीड या रस्त्यांवर लूटमार करत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र याप्रकरणी ट्रकचालकांनी फिर्यादी नोंदवले नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)