Our Feeds

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

DNA Live24

महामार्गावर लुटमार करणारी टोळी नगर तालुका पोलिसांकडून जेरबंद


अहमदनगर | DNA Live24 - नगर-औरंगाबाद आणि नगर-मनमाड महामार्गावर मध्यरात्रीच्या वेळी ट्रक चालकांना अडवून लुटमार करणारे आरोपी नगर तालुका पोलिसांनी गजाआड केले आहेत. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक जयंत कुमार मीना, नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे व सहकाऱ्यांनी कामगिरी केली.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

नितीन किसन पवार (रा. अंबिकानगर, केडगाव), अरुण बाबासाहेब घुगे (केडगाव) व ऋत्विक अशोक नरवडे ( देवी मंदिरासमोर, केडगाव) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी नितीन पवार यांनी चास शिवारात जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेशातील एका ट्रक चालकाला मारहाण करून त्याच्या जवळचा १३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

अशाच प्रकारची लुटमारीची घटना नगर पुणे मार्ग कामरगाव शिवारात घडली होती. नगर तालुक्यातील सांडवे येथील ट्रकचालकाला १४ सप्टेंबर रोजी बेदम मारहाण करून लुटले होते. लाल रंगाच्या पल्सर दुचाकीवर येऊन ट्रक चालकाला तिघा जणांनी कत्तीचा धाक दाखवला. सोनल पेट्रोल पंपाचे पार्किंग जवळ हा प्रकार घडला होता. या गुन्ह्यात नितीन पवार, अरुण घुगे, ऋत्विक नरवडे यांना अटक करण्यात आली आहे.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

या टीमची कामगिरी - एपीआय किरण शिंदे यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू फोलाने,  संभाजी डेरे, रवी औटी, आनंद सत्रे,  साबीर शेख, अशोक मरकड, राहुल शिंदे रावसाहेब खेडकर, विनोद पवार, संदीप जाधव, रामदास तमनर, महिला पोलिस कॉन्स्टेबल अनिता विधाते यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

 (आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)


पोलिसांनी रोड रोड रॉबरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या चारही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे शिवाय अशाच प्रकारचे गुन्हे नगर-पुणे महामार्गासह औरंगाबाद आणि नगर मनमाड महामार्गांवर देखील केले असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिस चौकशीत त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

 (आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »