Our Feeds

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

DNA Live24

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या बहुतांश मागण्या मान्य - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन


अहमदनगर | DNA Live24 - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार कायम सकारात्मक भूमिका घेत आहे. त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

महाजन यांनी शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णाशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने अण्णांनी नमूद केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांना सांगितले. स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा आणि पिकांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय झाला असून येत्‍या हंगामापासून तसा दर शेतकऱ्यांना निश्‍चितपणे मिळेल, असे महाजन यांनी सांगितले.

याशिवाय पाण्याचा प्रश्न लक्षात घेता राज्यात ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर वापरासाठी प्रोत्साहन देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आहे त्यामुळे ग्रुप साठी ठिबकसाठी साडे आठशे कोटी रुपये तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अण्णांनी नमूद केलेले काही प्रश्न हे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत असून केंद्र शासनाने यासंदर्भात निवडणूक आयोगाची पत्रव्यवहार केल्याचे महाजन यांनी अण्णांना सांगितले.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनीही अण्णांना याबाबत कळविले आहे. केंद्रात लोकायुक्त आणि राज्यस्तरावर केंद्रात लोकपाल आणि राज्य स्तरावर लोकायुक्त यांची नियुक्ती करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाल्याचे महाजन यांनी अण्णांच्या निदर्शनास आणून दिले.

शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूवरही २० ते १२ टक्के असा जीएसटी लागू करण्यात आला आहे. तो ५ टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्याची मागणी अण्णांची आहे, यासंदर्भात आपण मुख्यमंत्री यांच्याशी बोलू आणि त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे महाजन यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाजन यांनी अण्णांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »