जिगरबाज मावळ्यांची अपघातग्रस्त सेनापतीला मदतअहमदनगर । DNA Live24 - शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे श्रीगोंदा ग्रुपचे अध्यक्ष राजेश इंगळे हे काही महिन्यांपूर्वी एका अपघातात जखमी झाले होते. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या ग्रुपचे सदस्य असलेल्या मावळ्यांनी त्यांना अपघात मदत निधी म्हणून २८ हजार रुपये स्वयंस्फूर्तीने गोळा करून दिला. संवेदना जपत कृतज्ञतापूर्वक केलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे राजेश इंगळे हे दरमहा एका गडकिल्याची ट्रेकिंग मोहीम करतात. त्यांनी स्वतः आत्तापर्यंत ५५ गडकिल्ले चढले अाहेत. श्रीगोंदा तालुक्यात त्यांचा जवळपास ८० जणांचा ग्रुप तयार झालेला आहे. या ग्रुपमध्ये शिक्षक, डॉक्टर, महाविद्यालयीन युवक, पत्रकार, वायरमन, व्यावसायिक, महिला, व शेतकरी देखील समाविष्ट आहेत.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

सर्व गडप्रेमी महाराष्ट्रातील दरमहा एका दुर्गम, दुर्लक्षित गडकिल्ले, शिवदुर्ग, गडाची माहिती घेण्यासाठी ट्रेकिंग मोहिम आयोजित करतात. या ग्रुपने आत्तापर्यंत ७ ट्रेकिंग मोहिमा यशस्वीपणे राबवल्या आहेत. धर्मवीरगड, रायगड, राजगड, लोहगड, कुलाबा, उंबरखिंड, वर्धनगड, पुरंदर, दौलत मंगल, आदी मोहिमा देखील केल्या आहेत. याशिवाय भविष्यात इतर मोहिमा प्रस्तावित आहेत.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

दोन महिन्यांपूर्वी राजेश इंगळे हे एका मोहिमेवरून घरी परतत असताना रात्रीच्या वेळी रस्त्यात असलेल्या खड्ड्यामुळे त्यांच्या दुचाकीचा अपघात होऊन पायाचे हाड मोडले. त्यांच्यावर दौंड येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले. सुमारे एक लाख रुपयांहून अधिक खर्च आला. हा अपघात त्यांच्या कुटुंबावर व ट्रेकर्स ग्रुपवर खूप मोठा आघात होता.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

त्यामुळे संकटकाळी खारीचा वाटा म्हणून व आपल्या सेनापतीला साथ देण्यासाठी, तसेच एक समाजिक बांधीलकी जपण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या मावळ्यांनी स्वयंस्फूर्तीने २८ हजार रुपये संकलित केले. ती रक्कम एका घरगुती छोटेखानी कार्यक्रमात राजेश इंगळे यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या खड्ड्यामुळे अपघात झाला तो खड्डाही शिवदुर्ग फाउंडेशनच्या मावळ्यांनी बुजवत एक नवा आदर्श निर्माण केला.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

मदतनिधी संकलनासाठी जयराम खोसे, प्रमोद शिर्के, साईकुमार शिंदे, संदिप हिरवे, सोमेश शिंदे, मारुती वागस्कर, जालिंदर पाडळे, संतोष पवार, कपिल उल्हारे, बाळकृष्ण भापकर, संदिप होले, डॉ, चंद्रशेखर कळमकर, अविनाश निंभोरे, संदिप खलाटे, संदिप मांडे, राजाराम सातपुते, प्रशांत बोरुडे, रविंद्र वाव्हळ, अशोक टकले, अनंत वागस्कर, संजय सुपेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

हा जिंदा है हम ! - समाजात माणुसकी कमी होत आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांनी व प्रेरणेने झपाटलेली अशी कोठेतरी मायेची माणसे असतात. त्याचेच हे प्रतीक आहे. आपल्याच मावळ्यांचे आपल्यावरील प्रेम पाहून अपघातातुन लवकर बरे होण्यास मदत होईल. मी लवकरच पुढील ट्रेकिंग मोहिमेत सामील होईल, अशी भावना राजेश इंगळे यांनी व्यक्त केली.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)