..म्‍हणून आशिया चषकात विराटला विश्रांती!


नवी दिल्‍ली : DNA Live24 - भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला आशिया चषक स्‍पर्धेत विश्रांती देण्यात आली होती. मुख्य प्रशिक्षक रवी शास्‍त्री यांनी विराटला विश्रांती देण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे. विराटच्या अनुपस्‍थितीत रोहीत शर्माच्या नेतृत्‍वाखाली भारतीय संघाने सातव्यांदा आशिया चषक जिंकण्याची कामगिरी केली. अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर तीन गडी राखून विजय मिळवला.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

रवी शास्‍त्रींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, विराटला या विश्रांतीची गरज होती. तो ताकदीने एखाद्या बैलाप्रमाणे आहे, त्याला आपण मैदानाबाहेर घालवू शकत नाही. जर विराट खेळला तर सामन्याचा माहौल वेगळा असतो. त्यामुळे हा केवळ मानसिक थकव्याचे प्रकरण आहे.   
(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

शास्‍त्री पुढे म्‍हणाले की, विराटला थोडी विश्रांती द्यावी. क्रिकेटवरून त्यांचे लक्ष काही हटवल्यास तो पुन्‍हा नव्या अंदाजात परत येईल. तसेच त्यांनी सांगितले की, संघातील इतर खेळाडूंबाबतही अशीच प्रक्रिया अवलंबली जाते. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार यांच्याबाबतही असाच निर्णय घेतला जातो. त्यामुळे ते पुन्‍हा नव्या दमाने खेळतात.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

विराटने इंग्‍लडविरुद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघाची धुरा सांभाळली होती. यामध्ये भारताला १-४ ने मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर वेस्‍ट इंडिजच्या विरोधात ४ ऑक्‍टोबरपासून भारत दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यासाठी विराटच्या नेतृत्‍वाखाली १५ जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी रोहीत शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर आणि बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. तर युवा पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांना संघात स्‍थान देण्यात आले आहे.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)