ये नया हिंदुस्तान है ! ये घर में घुसेगा भी, और मारेगा भी..

बॉलिवूड | DNA स्पेशल  - 

कश्मीर खोऱ्यात असलेल्या भारतीय सैन्याच्या उरी बेस कॅम्पवर पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय जवानांनीही पाकव्याप्त काश्मीर भागात सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवादी कॅम्प उध्वस्त केले होते. या घटनेला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय सैन्याने अनपेक्षित पणे केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे दहशतवाद्यांच्या उरात धडकी भरली. आम्हीही चोख प्रत्युत्तर देऊ शकतो, हे भारतीय जवानांनी दाखवून दिले.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

बॉलिवूडचा डायरेक्टर आदित्य धर याने या घटनेवर आधारित सिनेमा काढण्याचा विडा उचलला होता. विक्की कौशल आणि यामी गौतम यांची प्रमुख भूमिका असलेला 'उरी' हा सिनेमा अखेर जानेवारीत प्रदर्शित होतोय. नुकताच २८ सप्टेंबर रोजी या सिनेमाचा टीजर रिलीज झालाय. विशेष म्हणजे यु ट्युबवर त्याला अल्पावधीतच अफाट प्रतिसाद मिळाला आहे. यावर प्रतिक्रिया नोंदवताना प्रेक्षकांनी 'कधी एकदा हा सिनेमा रिलीज होतोय आणि आम्ही बघतोय', अशा शब्दांत आपली उत्सुकता दर्शवली आहे.

टीजरमध्ये कानावर येत असलेला आवाज सांगतो की, 'हिन्दुस्तान के इतिहास में आजतक (भारतीय) सेना ने कभी दूसरे मुल्क पर पहले हमला नहीं किया.. लेकिन यही मौका है इनके दिल में डर बैठाने का। ये नया हिन्दुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी।' - यावरून भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक का केला, याची जाणीव होते. हा सिनेमा या सर्जिकल स्ट्राईकवरच आधारित आहे.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

संदीप सिंग शहिद - या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे लांस नायक संदीप सिंह गेल्या आठवड्यात २५ सप्टेंबर रोजी कुपवाड़ा परिसरात झालेल्या एका चकमकीत शहीद झाले. तरीही अखेरचा श्वास घेण्यापूर्वी त्यांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. मात्र दहशतवाद्यांच्या बंदुकीतून निघालेली एक गोळी संदीप सिंह यांच्या मस्तकात लागली होती. त्यामुळे त्यांना वीरमरण आले.

तीन किलोमीटर आत घुसले - लान्स नायक संदीप सिंह हे २००७ मध्ये सैन्यात भरती झाले होते. सर्जिकल स्ट्राइक वेळी ते पैरा कमांडो दलात सहभागी होते. १८ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्य दलाच्या शिबिरावर  दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात २१ जवान शहीद झाले होते. त्याचा बदला म्हणून २९ सप्टेंबर रोजी भारतीय सैन्याने एलओसी पार करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीन किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांना यमसदनी धाडले.


(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)