ज्यांना घराजवळचा रस्ता करता आला नाही ते काय उड्डाणपूल करतील ?नगर -  महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. सर्व प्रभागांचा बारकाईने अभ्यास करून सक्षम व जनतेतील उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वात जास्त इच्छुक उमेदवारांची संख्या होती त्यामुळे उमेदवार निवडताना मोठी स्पर्धा होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुद्दाम काही गैरसमज पसरवून शहरातील वातावरण बिघडत चालले आहे. विकासाचे मुद्दे दूर गेले आहेत. मात्र हे निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या मुद्यावर लढणार आहे. महापौर असताना कोठी ते यश पॅलेस रस्त्याच्या कामास कोट्यावधी रुपयांचा निधी मंजुरी आणून शहरातील सर्वात सुंदर हा रस्ता पूर्ण केला. तसेच आनंदधाम ते स्वस्तिक चौक हा रस्ताही दर्जेदार करून मॉडेल रस्ता केला आहे. मात्र याच रस्त्यावर राहणाऱ्या मोठ्या लोकप्रतिनिधीला शहरामध्ये असे एकही मोठे काम करता आले नाही. ज्यांना आपल्या  घराजवळचा रस्ता करता आला नाही ते काय उड्डाणपूल करतील ? अशी तोफ आ. जगताप यांनी  खासदार गांधींवर नाव न घेता डागली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


राज्यातील सत्तेचा गैरवापर करत आम्हाला अडचणीत आणून  खोट्या प्रकरणात आत टाकून औरंगाबादला ठेवले. प्रशासनावर मंत्र्यांचा दबाव आणून आमच्यावर कारवाई करण्यास भाग पाडले. मात्र मी डगमगलो नाही, प्रसंगाला सामोरे गेलो. अशा गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. जर अशा विचारांची येणा-या दिवसात वाढ झाली तर त्याचे परिणाम आम्ही भोगली आहेत. उद्या तुमच्यावरही अशी वेळ येऊ शकते. पण तुम्ही काळजी करू नका तुमच्या पाठीशी आमची ताकद आहे. म्हणून भावनांवर आता निवडणूक लढवण्याचे दिवस गेले आहेत, विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १४ मधील राष्ट्रावादी कॉंग्रेसचे उमेदवार नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानागरे, शीतल जगताप, मीना चोपडा यांच्या प्रचारच्या नियोजन बैठकीत आ. जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी आ.अरुण जगताप होते. यावेळी परिसरातील विविध क्षेत्रतिल नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगताप  म्हणाले,  महापौर असताना तसेच आमदार अरुण जगताप व माझ्या आमदार निधीतून शहरामध्ये सर्व भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. सारसनगर परिसरात मोठे विकास कामे केली, अनेक पूल निर्माण केले. फेज टू योजना आज फक्त सारसनगर मध्येच कार्यान्वित झाली आहे. केलेल्या या विकासकामांच्या जोरावर ही महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार आहे. त्यामुळे येत्या 10 तारखेला जेव्हा निकाल घोषित होतील तेव्हा प्रभाग एक पासून सुरु झालेली विजयाची  घोडदौंड प्रभाग 15 पर्यंत चालू राहून सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून येतील , असा विश्वास यांनी  व्यक्त केला.

यावेळी बोलताना नगरसेवक गणेश भोसले म्हणाले, महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की शहराच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला जातो. शहरात एमआयडीसी मध्ये मोठे कारखाने अनु,  उड्डाणपूल करू अशी स्वप्ने दाखवली जातात. मात्र उड्डाणपूल एमआयडीसी हे कामे काय महानगरपालिकेचे आहेत काय ?  हे विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील मुद्दे आहेत. महानगरपालिकेत हे मुद्दे उपस्थित करून विरोधक जनतेस खोटी स्वप्ने दाखवुन वेडे बनवत आहेत. मात्र ही निवडणूकित मूलभूत सुविधांवरच  बोलले पाहिजे.  दोन्ही जगताप आमदारांचे शहराच्या विकासासाठी पूर्वीपासूनच मोठे योगदान आहे. सारसनगरचा मोठा विकास करून त्यांनी सारसनगरचे चित्र बदलले आहे.

यावेळी उमेदवार प्रकाश भागानागरे, शीतल जगताप, मीना चोपडा, संजय चोपडा,राष्ट्रावादीचेशहराध्य माणिक विधाते, श्री. दरेकर, कांतीलाल गुगळे, डॉ.विजय भंडारी, बबनराव घुले, प्रा.पोपटराव काळे, अर्जुन बोरुडे, विठ्ठल गुंजाळ, अलका मुंदडा, दिनेश जोशी, सुमतिलाल कोठारी, बापूसाहेब कुलट, ज्ञानदेव पांडूळे आदींनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कराळे यांनी केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या