नगर जिल्ह्यातील 198 ग्रामसेवकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ

यशस्वी पाठपुराव्यासाठी युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांचा सत्कार

नगर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डि.एन.ई 136 चे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य, जिल्हा पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमामुळे शासन स्तरावर कंत्राटी सेवाकाळ ग्राह्य धरण्यात आला होता. त्याचाच परिपाक म्हणून संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नगर जिल्हा परिषदेमार्फत 12 वर्ष सेवा झालेल्या 160 ग्रामसेवकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 38 ग्रामविकास अधिकार्‍यांना 24 वर्ष सेवा झाल्याने आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ मिळाला आहे. या लाभाबद्दल ग्रामसेवकांनी जल्लोष करीत युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांचा पेढे भरवून सत्कार केला..

सदरचे आदेश पारीत होण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, वासुदेव सोळंके, कक्ष अधिकारी भिटे, कार्यालयीन अधीक्षक वाघ, कक्ष अधिकारी शेख, दळवी,संदीप तुळेकर, विशाल भिंगारदिवे, संजय नेव्हल यांचे सहकार्य मिळाले.

ढाकणे यांच्या सत्कारावेळी अंकुश वेताळ, सतीश मोटे, गंगाधर राऊत,सुनील नागरे, विलास काकडे, सुरेश मंडलीक,राजेंद्र मेहेत्रे, घुगे मामा, एकनाथ आंधळे ,मंगेश पुंड, शहाजी नरसाले,संतोष खाडे,अभय सोनवणे, एकनाथ आंधले,अहमद शेख,नारायण खेडकर,बाळासाहेब आंबरे,विट्ठल आव्हाड, शरद फाटके ,गणेश डोंगरे, दिलिप नागरगोजे, सचिन मोकाशी, महेश जगताप, तात्यासाहेब ढोबे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या